सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||१||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रें मनकामना पूर्ती ||धृ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमारा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरें चरणी घागरीया ||२||

लंबोदर पितांबर फणीवर बंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ||३||