विघ्नांतक विघ्नेशा आरती तुला ।
करितो मी प्रेमभावे तारी तू मला।।धृ।।
गिरिजेच्या अंकी बैसोनी दाविसी लीला।
शंकरही प्रेमभरुनी पाहती तुला।।१।।
वक्रुतुंड गजवक्त्रा स्तविती जे तुला।
देसी तया मुक्ती तैसी देई तू मला।।२।।
अहंभाव सोडुनी तव चरण पदाला।
आलो मी एकदंता देई बुद्धिला।।३।।