जय देव जय देव जय वक्रतुंडा।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥ जय ॥ धृ० ॥

प्रसन्नभाळा विमला करिं घेऊनि कमळा।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला ||
रुणझुण करिती घागरिया घोळा।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ॥ जय ॥ १ ॥

सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक् तातक् थैय्या करिसी आनंदा।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय ॥ २ ॥

अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना |
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ॥
जय देव जय देव जय ॥ ३ ॥