DevDharm —

घरी बसून कंटाऴला असाल तर एक जगाच कल्याण करणारं काम करू शकता.आंबे खाणार आहांत तर त्यांच्या कुया कोरड्या मातीत किंवा राखेत बुडवून ठेवा म्हणजे कोयीचा ओलावा शोषला जाईल. माती,राख नसेल तर कुया सांवलीत वाऴवा.८ दिवसानंतर कोय उगवण्यास पात्र होईल..
आपल्याकडील दुधाच्या पिशव्याना पंचिंग ...(भोके पाडून) त्यात माती भरून त्यात कुया पूर्णपणे मातीत गाडा...
त्या पिशव्या सावलीत ठेवा.रोज पाणी घाला.... १५दिवसात अंकूर येईल.
करता येईल तेव्हडी रोपे तयार करा ,पाऊस सुरू झाला कि कुठेतरी लावता येईल किंवा कुणाला तरी देता येईल.
सहज जाता जाता वृक्ष चऴवऴीचे शिलेदार व्हाल.
सर्वच शासनाने,महापालिकेने, ग्रामपंचायतीने,किंवा NGO नी करावे याची वाट न पहाता हिरव्या चऴवऴीत भागीदीरी तीही सहज करता येईल, मुलांनाही बी कशी उगवते,कोंब कसा येतेा त्याच पान,कऴी ,फुल,फऴ कस होत य़ाचा घरबसल्या निरिक्षण करता करता अभ्यासही होईल.
आम्रवृक्षांच आय़ुष्य १५०/२०० वर्षाचे,१२महिने हिरवेगार, जगातलं मन शांत करणारं एकमेव झाड,त्यामुऴे सर्व शुभकार्यात हवं,मुहूर्तमेढला ढापा,मांडवात अडकवलेले डहाऴे, आंबा पानांचे तोरण,मुलीला हऴदही आंबापानाने... मोहोर आलाकी मधमाशीच आगमन शेतीत धान्यवाढीसाठी खूप आवश्यक असतं यासाठीच आंबा लागवड महत्वाची.....
रोपे घरी तयार व्हावीत ,सर्वत्र आमराया दिसाव्यात, त्यासाठी आपला सहभाग महत्वाचा...
यासाठीचा अल्पसा प्रयत्न पण कुणी सांगावे गर्द जंगलही तयार होईल,सोबत आपली हवी म्हणून ही शब्द पेरणी...

आवडले नाही तरी सर्वांना पाठवा हे गरजेचे आहे म्हणून...
नातवंडाना प्राणवायू मिऴावा .... तो ही सहज व स्वच्छ यासाठी तरी .....


चंद्रकांत यशवंतराव चव्हाण
वृक्षमित्र,मराठा महासंघ कोल्हापूर,
9420335334