DevDharm —

स्तंभलेखक: श्री भूषण कात्रे
पत्ता:  मुंबई
संपर्क:  +91 98200 71261

------------------------------------------------------------------------

विषय: प्रवासवर्णन

अल्लेप्पी ला जाताना मात्र जाम कंटाळा आला गरम प्रचंड(मेहिन्यात कसे येतात लोक काय माहीत)खूप ट्राफिक आणि स्वरा पण रडत होती सारखी आणि तुम्ही जो रूट ठरवला त्यात बदल केले की हे सर्व घड णार झालं काय अलेप्पी जात असताना आमच्या ड्रायव्हर च गाव लागत मध्य त्याने मला सांगितलं गावात पण छान मंदिर आहे येता का(मी नको म्हणालो) त्याने होकार गृहीत धरून तर त्याने सरळ गाडी गावात उभी केली मंदिर समोर तो येण्यासाठी खूप आग्रह केला त्याचा आग्रह मोडवेना मंदिर छान होत(भगवती) त्या पेक्षा मिळालेला प्रसाद छान होता(पायसम) त्याला काय वाटलं त्याने सर्वांना त्याचा तर्फे सरबत पाजलं त्यामुळं तास भर सहज निघून गेला त्यामुळे पुढच्या ठिकाणी आम्हला पोचायला उशीर होणार होता शेवटी निघालो मधे veg हॉटेल मिळेना बऱ्याच वेळाने मिळालं आर्या म्हणून जेवायला बसलो त्या वेटर ने केळीची पान लावली(मनात म्हणालो वा) पण जेवण पाहिल्यावर विशेषतः भात एकदम नैराश्य आलं एवढे पदार्थ(पोळी सोडून) एकाला चव नाही जाडा कैद्यांना देतात तो भात त्यात त्याने मल्याळम भाषेत सुरवात करा म्हणून ओरडला सुरवात केली त्याला विचारलं लोणचं नाही का परत तो ओरडला आधी पाणी देतोय ना मग मी ओरडलो पाणी आधी द्यायचं भात संपल्यावर लोणचं आणणार का ?तो माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत तणतण गेला एकदाच लोणचं आणून भाजी सारख वाढलं प्रत्येकाला दिल टाकून ते सगळं संपत आल्यावर पापड घेऊन आला स्वरा पण रडत होती मंदार ने आईस्क्रीम दिल आणून ती सांडवत खात शांत झाली ,एकदाच जेवण झालं ,आईस्क्रीम खाऊन बाहेर पडलो परत तो कंटाळवाणा प्रवास जस अलेप्पी जवळ आलो तस बर वाटायला लागलं मी केदार कुणाल तिघे map वर हॉटेल शोधायला लागलो 3:30वाजून गेलेले आम्ही माझ्या हिशोबाने 2ला पोचायला हवं होतं केदार च्या मॅप ला आमचं हॉटेल चिलंका लेक ( Starting Point Road, Punnamada, Starting Point, Alappuzha, Kerala ph 083770 04514) भलतीकडे च दिसत होतं आमच्या सुचनाकडे दुर्लक्ष करून ड्रायव्हर ने केदार ने सांगितलेला right मारला पुढे गेल्यावर चुकलो अस समजलं गल्ली अरुंद असल्याने st सारख मागे कर पुढेकर गाड्या बाजूला कर अशी सव्य अपसव्य करत एकदाची गाडी बाहेर काढली आमच्या नेट प्रमाणे जाऊन पण मिळेना शेवटी फोनाफोनी केल्यावर लक्षात आलं की गाडी तिथे नाही जात आमचं लोकेशन जेव्हा आलो अस दाखवत होत तिथून केनॉल च्या बाजूने गल्लीत चालत जायचं होतं चरफडत सगळे उतरलो चालायला लागतो(भरपूर लांब वाटलं) एकदाचे पोचलो पोचल्यावर मात्र चालणं सार्थकी लागल्यासारख वाटलं हॉटेल चिलंका लेक व्ह्यू एकदम झक्कास स्वच्छ ,लेक ला लागून, टापटीप ज्या माणसामध्ये रसिक पणा आहे निसर्ग सानिध्य आवडत त्यांनी जरूर यावं ज्यांना नाही त्यांना ठाण्याचे तालावपाळी हे सारखच असो मार्व्हलस^^ लोकेशन फटाफट चेक inn केलं टेबल फॅन पण रिमोट वर चाललेला पहिल्यदा बघितला रूम मध्ये तिथं पर्यंत4वाजले होते सर्वांना 15मिनिटात तयार व्हा लगेच बाहेर पडायच आहे असं सांगितलं पूजा सोडून सर्व तयार झाले हॉटेल वाल्याला चहा हवा म्हणून सांगितलं आणि बोट आणि हवी म्हणून सांगितलं 2तास1200रु होतील अस म्हणाला बोलवा म्हणून सांगितलं 15मी बोट आली चहा आला पूजा नाही आली मग मयुरा गेली तिला घेऊन आली(कशी आली देव जाणे पण आली) चहा पिऊन प्रवास सुरु झाला अल्लेप्पी अलपुषा' अलपूझा अश्या नावाने प्रसिद्ध असलेले शहर आज बघायला मिळणार बोटीचा प्रवास करायला मिळणार म्हणून आनंद वाटत होता फक्त 2गोष्टी बघायच्या अस ठरलं होतं एक बोटीतून फिरणे (1-2तास)2 दोन अंबलपुषा श्रीकृष्ण मंदिर बोट स्टे खूप महाग होता आणि अनुभवी लोकांकडून पाण्याला वास मारतो मच्छर चावतात नॉनव्हेज veg एकत्र असत वगरे त्यामुळं ते नकोच होत ऐकलं केरळला देवांची भूमी असे म्हटले जाते , त्यातही अल्लेप्पी किंवा अलाप्पूझा हे केरळमधील एक पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे व अत्यंत आवडते आणि लाडके असे ठिकाण आहे. अल्लेप्पीला चहूबाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले असून याला ‘ पूर्वेचे व्हेनिस ’ म्हणूनही ओळखले जाते. येथील आसमंतात निसर्गाने आपला अमूल्य नजराणा जागोजागी मुक्त हस्ते उधळला असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.अरबी समुद्र व त्याला चहूबाजूंनी येऊन मिळणार्याि सहा आडव्या उभ्या नद्यांमुळे तयार झालेल्या जाळ्यांत अल्लेप्पी वेढले गेले आहे. येथे सहा गोड्या पाण्याच्या नद्यांखेरीज अनेक प्रवाह,तलाव,विस्तीर्ण सरोवरे, जलाशय व ओढे एकमेकांना छेदतात व त्यामुळे त्यांच्या मध्ये जे पाण्याचे खूप रुंद पट्टे (कॅनाल) बनतात त्यातूनच बोटीतून पर्यटकांना सफर घडवली जाते. सभोवतालच्या मनोहर निसर्गाचे मन लुभावणारे अप्रतिम व अवर्णनीय सृष्टी सौंदर्य पाहतांना भान हरपून जाते,तहान-भूक विसरायला होते.कितीही डोळे भरून पाहून घेतलेतरी मनाचे तृप्तीच होत नाही. परतूच नये असे वाटते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केरळला व त्यातही अल्लेप्पी येऊन हा अलौकैक अनुभव स्वत: प्रत्यक्ष घ्यावाच 1तास प्रवास kela फोटो व्हिडीओ काढले मजा करून फिनिशिंग पॉईंट ला उतरलो तिथे आधीच आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन येणार होता (तो आलेला होता) तिथून मंदीरात जायला निघालो.वाटेत प्रत्येकाला थंडा घेतला 14km प्रवास करून पोचलो मंदिरात तेव्हा नुकताच मंदीर भर दिवे लावायचं काम चालू होतं मस्त प्रसन्न वाटलं दर्शन घेतलं तिथे आरती पण मस्त चालू होत वेगवेगळ्या वातीच्या आरत्या होत्या एकही वात न पडता तो ओवाळत होता एकदम प्रेक्षणीय वाटलं एक तरुण ढोलकी सारख वाजवत पहाडी आवाजात म्हणत होता केदार त्याचा बाजूला उभा राहून तन्मयतेने ऐकत होता ते सर्व आटपून प्रसाद कुठे मिळतोय का बघितला इकडे जा तिकडे जा करत राहिलो शेवटी तो नाद सोडला आणि चहा पिऊन घरी जायला निघालो येताना नेट वर जेवायच ठिकाण शोधलं पण त्याचा आधीच ड्रायव्हर ला दुसरं ठिकाण मिळालं तिथे तर जेवण हॉरिबल होत जाड पोळ्या बेचव भाजी शेवटी उत्तप्पा खाऊन बिल देऊन बाहेर पडलो हॉटेल जवळ उतरलो।ड्रायव्हर सकाळी येतो सांगून निघून गेला पुन्हा तो रस्ता कापत हॉटेल गाठलं खूप दमलो तेव्हड्यात महेश आला म्हणाला अरे तो मॅनेजर म्हणाला या हॉटेल मध्ये बीफ(गायीचं मास) वगरे बनत तुम्हला सकाळी नाश्ता चालेल का? बापरे नकोच कोणीही काहीच घ्यायचं नाही असं ठरवून मस्त झोपलो सकाळी उठून फोटो काढले तिथून पुढच्या प्रवासात निघालो ठेक्केडी


अल्लेप्पी तुन निघालो मध्ये नास्ता केला(गार वडे इडल्या) घाट सेक्शन असल्याने जाम कंटाळा आला काहींना गाडी लागली कधी संपतोय प्रवास अस झालं एकदाचे पोचलो 2वाजल्यान मीे जेवणाची घाई केली म्हणालो हॉटेल जवळ आलोय चेक in मग करू आधी जेवून घेऊ कुणाल म्हणाला तू जा मी चेक in करून येतो आणि आलापण हॉटेलात गेल्यावर समोरच बॉम्बे थाळी लिहिलेली दिसली तीच मागवलीजेवण mst होत 290ru लिमिटेड) बाकीच्यांनी राईस मागवले हॉटेल मस्त होत आणि थंड होत (निन्जा होम स्टे )त्या बाईला धड बोलता येत नव्हतं ती खूण करून काहीतरी सांगत होती रूम वर गेलो महेश म्हणाला पुढचा प्लॅन काय() म्हणालो आराम करा 5वा निघू सगळ्यांनी आराम केला मी प्रवास वर्णन लिहीत बसलो 5ला सर्व तयार झाले गाडी काढली टायगर रिझर्व्ह ला गेलो 1200तिकीट मरो जातंय कोण thekkedi ला बघण्यासारखं काही नाहीच अर्थात हिल स्टेशन ते मग गाडी सोडली आणि मार्केट ला भटकंती सुरू केली मार्केट झक्कास केळावेफर्स एवढे स्वस्त की kya बात है(180kg) बऱ्याच जणांनी काय काय आणायला सांगितलं ते घेतलं काही नि आठवून आठवून घेतलं पुन्हा रूम वर आलो तासाभरात पुन्हा जेवायला बाहेर पडलो महेश म्हणाला दुपारच्या ठिकाणी जाऊ म्हणालो आज पाव भाजी खावीशी वाटते दुसरीकडे जाऊ तो म्हणाला इथे चांगली नाही मिळणार तरी हट्टाने गेलो पाव भाजी मागवली पाव भाजी बघितल्यावर जी सटकली अस वाटलं की तशीच फेकून मारावी 2पाव 1वाटी भाजी140ru) बंडल साले त्याला बोललो आयुष्यात कधी या हॉटेल ने पाव भाजी केली आहे का त्याने मुंडी डोलवत समर्थन दिल ते खावून निघालो रस्त्यात कॉफी वाला दिसला कॉफी मागितली भलतंच दिल काढा होता तो चांगला होता प्यायलो रूम वर येऊन झोपलो सकाळी अंघोळ करून निघालो ब्रेकफास्ट ची व्यवस्था मस्त होती मोठ्ठ टेबल पांढऱ्या शुभ्र डिश कप नाष्टा गरम गरम (नेहमी चाच इडली वडा अप्पम) तो खाऊन बाहेर पडलो मुन्नार च्या दिशेने ते पण तसच घाट जाम सर्व कंटाळले ,मध्ये चहा ब्रेक घेतला चहा वाला एकदम भारी होता त्याच दुकान विविध क्रिएटिव्हिटी ने भरलेल होत, कलाकुसर मला कधी जमलीच नाही साधं चांगलं अक्षर जमलं नाही इतर कला कुसर सोडाच पण दुसऱ्याची कला वाखाणता येण्यासाठी डोळे मन आणि रसिकता लागते, आम्ही त्याला दाद देऊन बाहेर पडलोे प्रवास सुरु केला काहींना गाडी लागली जाताना ड्रायव्हर रस्ता चुकला ते त्याला थेट मुन्नार आल्यावर समजलं आता परत जाण्यापेक्षा जेऊ खाऊ फिरू अस ठरलं जेवलो अन्नपूर्णा हॉटेल ला थाळी घेतली बरी होती फिरायला निघालो थेट डॅम जवळ तो ब्रिटीश लोकांनी बांधलेला त्यांच्या उपदव्यापा च कौतुक वाटलं फिरलो फोटो काढले मग टी फॅक्ट्री ला भेट दिली त्या आधी सॅम्पल चहा घेतला (भंकस) आलोच आहोत तर फेक्ट्री ला भेट देऊ म्हणून100₹ प्रत्येकी तिकीट काढून आत गेलो तर निराशा झाली काचेतून दाखवणार होते ते मशिनरी खूप लांब होती आणि लोकांची गर्दी पण होती गाईड त्यांनी असा दिलेले की तुम्हला शेवट पर्यंत कळता कामा नये काय बोलला ते तो इंग्लिश हिंदी मल्याळम भाषा एकसाथ बोलत होता आम्हाला कळे पर्यंत तो पुढे सांगे त्यामुळं आम्ही अर्थ लावण्याचा भानगडीत न पडता तो दाखवतो त्या दिशेने पाहू लागलो त्यात काही लोक इतक्या तो दाखवेल त्या काचेकडे झटकन बघायचे की मला वाटलं 1सेकंद जरी चुकला तरी तो सीन मिस होईल की काय शेवटी एकदाच ते संपलं 10मी बाहेर पडलो गाडीत बसलो आता थेट हॉटेल गाठायचं होत कल्लार मानकुलम रोड ला लागलो तो रोड पूर्ण खड्डे असलेला होता अरुंद मला गिरगावातल्या मुग भाट मधल्या गल्ल्या तिथे राजमार्ग वाटला असता, सर्व एवढे कंटाळलेले की कधी पोचतो अस झालं नंतर भयानक अंधार पडला नक्की पोचू ना अशी धास्ती वाटायला लागली रेंज नाही त्यामुळे अजून घाबरलो सर्व जण प्रवासात दात आवळून व गुडघे पकडून ताठ बसून राहिले. बचेंगे तो और भी लड़ेंगे. सध्या जोर बचेंगेवर होता. लढण्याचं पुढे बघता आलं असतं. हॉटेल बोर्ड दिसायला लागला तस माझ्या (सर्वांच्या)जीवात जीव आला. मी मुंबईला ऐकू जाईल एवढा मोठा सुटकेचा सुस्कारा सोडला त्या कंटाळवाण्या रस्त्यावरून मेस्ट्री गार्डन हॉटेलात प्रवेश करणे म्हणजे मुलांच्या हॉस्टेल मध्ये अचानक सुंदर मुलीने प्रवेश करण्यासारखं होत हॉटेल अगदी लौन्ड्री तुन धुवून आल्यासारखं स्वच्छ होत स्विमिंग पूल पण होत उद्या थंडी नसेल तर उतरायचं अस ठरवलं ते बघून आम्ही प्रवासाचा शीण विसरून गेलो रूम पण झक्कास सर्व जण एकाच रूम मध्ये बसलो उरलेला खाऊ संपवायला घेतला हल्ली एकत्र बसणं कोणाला नको असत प्रायव्हर्सि महत्त्वाची वाटते मात्र एकत्र बसलेले बघून मला बर वाटल आम्ही अस्वच्छ असू गरीब असू,पण माणुसकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अजूनही आपल्यात आहे काही गोष्टी मनावर टॅटू सारख्या कोरल्या जातात डोळे मिटले पापणीचा पडदा झाला की सिनेमा सारखे त्यावर दिसायला लागतात ,तेव्हडयात चहा आला तो प्यायलो 4फ्राय राईस ऑर्डर दिली तो पण सम्पवला मग थोडा वेळ tp करून आणि झोपलो सकाळी उठून पहिले खाली गेलो नाष्टा तयार होता(तोच तो) केला मग स्विमिंग पूल ला उतरलो पहिला मी मग कुणाल मंदार महेश मग केदार असे उतरलो मनोसोक्त खेळ लो आमचं पाहून काही लोक पण उतरली म आम्ही बाहेर पडलो आता निघायची घाई होती 10वाजले होते 5तास लागतील अस ड्रायव्हर म्हणाला प्रत्यक्ष3तासात आलो मध्ये जेवायला1तास काढला 3वाजताच एअरपोर्ट ला त्याने सोडल मग हिशोब झाला टोटल22000 रु झाले प्रवास छान झाला त्याला by करत असताना स्वरा त्याला टाटा करत होती तिला बघून तो परत मागे आला स्वराचा पायांना हात लावून पाया पडला(का ते नाही समजलं) आता एअरपोर्ट ला प्रवेश केला 4तास होते बसलो वेळ काढत एकदा ccd ची40 घालून कॉफी घेतली विमानतळाच्या भव्य, सुसज्ज आणि सुरेख वातावरणात आम्ही प्रवेश केला.(मुंबई चा अजून मस्त) बॅगा चेकिंगसाठी पाठविण्यात आल्यानंतर बोर्डिंग पास घेतला मेटल डिटेक्टरमधून आणि नंतर मॅन्युअली तपासणी झाल्यावर आम्ही वेटिंगरूममध्ये थांबलो. टॉक-टॉक करीत चालणाऱ्या त्या टकाटक मुली, टाय सूट-बुटातले तिथले कर्मचारी, तिथली स्वच्छता, स्टॉल्स सगळंच कसं मनोवेधक! विमानात बसण्याच्या कल्पनेने आम्हला गुदगुल्या झाल्या. विमानाजवळ आल्यानंतर सगळय़ांच्याच काळजाचे ठोके वाढले होते. चंद्रावर पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँगला कसे वाटले असेल याची कल्पना आम्हाला पहिल्यांदाच विमानात पाऊल ठेवताना आली.
. ‘वेलकम सर,’ ‘वेलकम मॅम’ म्हणत स्वागत करणारी आणि खरोखरच सुंदर दिसणारी ‘हवाईसुंदरी आपापल्या सीटवर स्थानापन्न झाल्यानंतर सगळय़ात आधी आमच्या मंडळींनी न सांगताच आपापले सीटबेल्ट उलटसुलट करून लावून टाकले. (मि तरी) न जाणो, पटकन विमान सुरू झाले तर बेल्ट लावायचा राहून जायचा आणि विमानाच्या गचक्याने तोंडावर पडायला व्हायचे. तेही त्या हवाई सुंदऱ्यांसमोर! उगीच रिस्क नको..
विमानाच्या पायलट केबिनमधून हिंदी आणि इंग्रजीतून दिली जाणारी माहिती सर्वजण अगदी कान देऊन ऐकत होते. थोडय़ा वेळाने एक हवाईसुंदरी विमानाच्या मध्यभागी उभी राहून घोषित होणाऱ्या सूचनांप्रमाणे ‘प्रात्याक्षिक’(कवायत) करून दाखवू लागली. ‘संकटकाळी स्वत:ला वाचविण्याचे प्रात्यक्षिक’ ती जेव्हा करून दाखवित होती, तेव्हा बेल्ट सोडून विमानातून धावत बाहेर पडावे असे एकदा वाटले. ? संकटाच्या वेळी  जाकिटचा वापर कसा करावा? याचे प्रात्यक्षिक स्क्रीन वर दाखवत होते पण ते इतक्या लवकरदाखवले गेले की पाहताक्षणी पटकन संपून  गेले.मला (बऱ्याच जणांना)त्यातले काही कळले देखिल नाही.  पायलट केबिनमधून वातावरण, उंची, विमान ज्या शहरांवरून मार्गक्रमण करीत होते त्या शहरांची नावे इत्यादी माहिती सांगितली जात होती, पण बाहेर काहीच दिसत नसल्यामुळे पायलट सांगेल ते खरे मानण्याशिवाय पर्याय नव्हता(काय फरक पडतोय कुठे का असेना) मग नाष्टा आला (सर्व जण माझ्याकडे बघत होते) मी काही घेतला नाही कारण सर्व हिशोब झालेला ज्याला हवं ते तो घेऊ शकत होता 2तास प्रवास केला मुंबई जवळ पुन्हा सूचना आली एकदाच विमान धावपट्टी ला लागलं उतरलो सर्वांचे निरोप घेतले प्रवास छान झाला 15हजार ऐवजी 13हजारात झाल्याचा आनंद प्रवासात 2गोष्टी ची दखल मी घेतली 1गुरुवायूर 2मुन्नार गुरुवायूर मंदिराचं कौतुक वाटल
तिथे चाळीस किलोमीटर परिसरात एवढे मोठे दगड नाहीत एवढे दगड आणले कुठून ते चढवले कसे तेव्हा आधुनिक मशिन्स नव्हती जगभर मायकल अँजेलो विंची च कौतूक होत पण भारतीय कलाकार नेहमीच अनामिक राहिले त्यांचं कौतुक कुणी केलंच नाही उलट एखाद् महान शिल्प झाल्यावर त्याचे हात कापले गेले कोणार्क मंदीर बनवणारा धर्मपाल ला नदीत ढकलून देण्यात आलं केवढी ही क्रूरता मी कुठल्याही ऐतिहासिक गोष्टी कडे मी सांस्कृतिक ममत्वाने आणि त्रयस्थ पणे पाहतो मुन्नार किंवा माथेरान मध्ये आपल्या डोंगराळ प्रदेशात या सर्वांपेक्षा जास्त सौन्दर्य आहे त्याचा आपण उपभोग घ्यायला हवा सृष्टी सौन्दर्य ही आरशात दाखवावी अशी पद्मिनी नाही किंबहुना ती इतरांना कशी घायाळ करेल तिला कशी नटवली पाहिजे याचा विचार व्हायला हवा पण डेव्हलपमेंट च्या कुणाच्याच अजेंडयात हे बसत नाही हे राष्ट्रीय दुर्दैव आहे


श्री भूषण कात्रे