चैत्र शु.१शनिवार
६ एप्रिल २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.
परवा आपण कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाविषयी माहिती घेतली आज पुढे.
माहिष्मती नामक साम्राज्याच्या महापराक्रमी सहस्त्रबाहुंचे बऴ असलेला योगेश्वर अष्टसिध्दिंनी युक्त असा कार्तवीर्य सहस्त्रार्जुन होता दत्तमहाराजांचा तो निस्सिम परमभक्त होता .दत्तपुराणानुसार त्याने दत्तप्रभुंकडे एक विशेष वर मागीतला होता तो असा "माझा मृत्यु भगवंताच्या हातुन यावा " दत्तमहाराजांनी त्याला हा वर दिला. सहस्त्रार्जुन एकदा नर्मदेच्या पात्रात सकुटुंब जलक्रिडा करत असताना त्याने आपल्या सहस्त्रबाहुंनी नर्मदेचा प्रवाह रोखला त्याच समयी लंका नरेश दशानन रावण नर्मदेच्या काठावर संध्यांवंदन करत होता. अचानक पाणी कसे अडले व आपले शिबिर कसे बुडतेय? हे पाहण्याकरता तो थोडा वरच्या दिशेस गेला तेथे सहस्त्रार्जुनास त्याने पाहिले व रावणाने त्याच्याशी वाद केला त्यांच्यात थोडि चकमक झडली तेव्हा सहस्त्रार्जुनाने रावणास कैद केले माहिष्मतीस नेवुन वानराप्रमाणे तुरुंगात डांबले.(भागवत महापुराण)
नंतर पुलस्त्य ऋषिंच्या सांगण्यावरुन रावणास त्यानी सोडले.
रावण हा तर पापी व दुष्ट होता बुध्दि ने आसुरी होता. पण तो संध्यांवंदन कधीच चुकवत नसे तो शास्त्रानुसार संध्या अवश्य करे . (हा प्रसंग व गोकर्ण महाबऴेश्वर स्थापन प्रसंगात त्याने संध्यावंदन वेऴ टळु दिली नव्हती) जर हा दुराचारी संध्येच्या व तपाच्या जोरावर सिध्दि प्राप्त करु शकतो तर सज्जनांनी संध्या नित्य केली तर ते अधीक चांगले फऴ प्राप्त करु शकतील यात संदेहच नाहि त्यामुऴे त्रैवर्णिकांनी व ज्यांचे ज्यांचे उपनयन झाले आहे त्यांनी उचीत संध्यावंदन करणे क्रमप्राप्तच आहे.
संध्या केल्याने पुण्य लाभत नाहि परंतु न केल्याने पाप मात्र अवश्य लाभते.
उदा.पाहा
आपण जर योग्य जागी वाहन उभे केले तर पोलीस आपणास बक्षीस देत नाहि कारण ते कर्तव्यात येते.परंतु अयोग्य जागेवर वाहन उभे केले तर मात्र दंड ठोठावला जातो.
#संध्या_म्हणजे_काय?
संधी समयास म्हणजे रात्र संपुन दिवस सुरु होतो तेव्हा प्रात:संध्या, सकाऴ व सायंकाऴ यांची संधी म्हणजे मध्यान्ह या समयी मध्यान्ह संध्या व दिवस संपुन रात्र सुरु होते तेव्हा सायंसंध्या अशा त्रिकाऴ संध्या करणार्यास तेज प्राप्त अवश्य होते. संध्येचे वैशिष्ट्य सांगताना भरद्वाज स्मृतित भरद्वाज ऋषि सांगतात
ब्रह्मव्याकारभेदेन याभिन्ना कर्मसाक्षिणी।
भास्वतीश्वर शक्ति: सा संध्येत्यभिहिता बुधै:।। (६.२)
संध्या हि अव्यक्त, निराकार परमात्म्याचे अभिन्न अंग आहे हि ब्रह्मस्वरुपिणी आहे.
ब्रह्म रुपापासुन हि त्रिधा होवुन तीन रुपे धारण करते. समस्त व्यक्त अव्यक्त, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, स्थूल व सुक्ष्म, प्रकट व अप्रकट कर्मांची साक्षी आहे ती प्रत्यक्ष द्रष्टि आहे तीच्यापासुन कोणतेहि कर्म लपुन राहत नाहि. दीप्तिमती स्वरुपाची भगवंताची शक्ती आहे या शक्तीलाच विद्वान संध्या असे संबोधतात..
प्रात:संध्या हि बालरुपा व ब्राह्मी आहे.
मध्यान्हसंध्या हि वैष्णवी व युवतीरुप आहे
सायं संध्या हि वृध्दा व रौद्ररुपी आहे
ऋक् यजु साम हे वेदत्रय हे संध्येचेचे एक रुप आहेत.

महाभारतात अर्जुनाने युध्द समयी "धुऴीची अर्घ्य "देवुन देखील संध्या केल्याचे वर्णन आहे.
सांगण्याचा हेतु हाच अाहे कि दुर्जन देखील संध्या करुन जर तेज प्राप्त करु शकत असतील तर मग सज्जनांनी ती केली तर सज्जनांचे किती कल्याण होईल याचा विचार अवश्य करावा.
संध्या न करता कोणतेहि खर्चीक अनुष्ठान केले किंवा कितीहि उपासना केली तरी ती व्यर्थच ठरते.
यामुऴे उपनयन झालेल्या त्रैवर्णीकांनी स्वअधिकारानुरुप किमान तीन अर्घ्य देवुन तरी स्वशाखेप्रमाणे दश गायत्री जप करावा.
रावण हा महापराक्रमी होता हा डंका वाजवणार्यांना रावणाचा पराभव रामांच्या आधी एकदा सहस्त्रार्जुनाने व नंतर वालीने केल्याचे वर्णीत आहे हे लक्षात घ्यावे .रावणाचा वध मात्र त्यांच्या हातुन होणार नव्हता त्यामुऴे रावण सुटला

सत्ता, वरदान व सामर्थ्य हे अंगी आल्यानंतर सहस्त्रार्जुनास थोडा मद झाला व त्याने वासिष्ठांचा आश्रम विनाकारण उध्वस्त केला तेव्हा वासिष्ठांनी याला शाप दिला कि भगवान परशुराम तुझा वध करतील. (विष्णु पुराण व वायुपुराण) .
विनाशकाले विपरीत बुध्दि या उक्तीस अनुसरुन या सहस्त्रार्जुनाने भगवंतांचे सामर्थ्य किती आहे याची चाचणी घेण्याकरता जमदग्नींच्या आश्रमात ससैन्य प्रवेश केला.सवत्स कामधेनु जमदग्नींच्या आश्रमात होती तिच्या कृपेने ससैन्य राजाचे आदरातिथ्य उत्तमोत्तम पध्दतीने जमदग्नींनी केले .हि सवत्स कामधेनु आपल्याकडे हवी या अट्टहासाने सहस्त्रार्जुनाने जमदग्नींचा आश्रम उध्वस्त केला व गोमातेस चोरुन नेले भगवान परशुराम जेव्हा आश्रमात परतले तेव्हा त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला व ते अत्यंत क्रोधीत झाले व सहस्त्रार्जुनाचा वध करेन अशी प्रतिज्ञा केली.
पुढे जमदग्नींनी काय केले? कामधेनु म्हणजे कोण? गोमाता का पवित्र आहे? या सर्वांचा उहापोह पुढिल भागात घेवु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले.
VengurlabhushanGmail.com