DevDharm —


चैत्र शु.५ बुधवार
१० एप्रील २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.
परवा आपण सहस्त्रार्जुनाद्वारे कामधेनुची चोरी व भगवान श्री परशुरामांची प्रतिज्ञा व जमदग्नींनी भगवंताना समजवणे पाहिले आज पुढे पाहु.
ब्रह्मदेवांनी भगवान परशुरामांना युध्दाकरता शंकरांची परवानगी घ्यायला सांगीतली महादेवांनी परवानगी दिली . भगवान श्री परशुराम आपला भयंकर परशू, बाणांचा भाता, ढाल व धनुष्य घेवुन युध्दाकरता निघाले. भगवंतांनी शरीरावर काऴे मृगचर्म धारण केले होते.जटा वाढलेल्या होत्या व त्या सूर्यकिरणांप्रमाणे चमकत होत्या. सहस्त्रार्जुनाने हा भगवंतांचा आवेश पाहिला व त्याने गदा, खड्ग, बाण, ऋष्टि, तोफा शक्ती या आयुधांनी युक्त हत्ती घोडे पायदऴ रथ यांनी सुसज्ज १७ अक्षौहणी सैन्य पाठवले.

भगवान परशुरामांचा वेग हा वायु व मनाप्रमाणे प्रचंड होता.भगवंतांनी आपल्या प्रचंड सामर्थ्याने हि फौज नष्ट केली. या युध्दाचे वर्णन एवढे महाभयंकर अाहे.भगवंतांच्या परशुचा एक प्रहार होताच सारथी वाहन व वीरांचे हात पाय छाटले जात होते.शत्रुच्या मांड्या खांदे तुटुन पडत होते.
सहस्त्रार्जुनाने हा भगवंतांचा प्रचंड आवेश पाहिला महाभयंकर संग्राम सुरु होता.भगवंतांनी गवताच्या पात्याप्रमाणे सैन्य कापुन काढले हजारो सैनिक, रथ, ध्वज, हत्ती घोडे हे सर्व भगवंतांच्या परशू व बाणांनी छिन्न भिन्न झाले होते सहस्त्रार्जुन प्रचंड संतापला तो रणांगणावर स्वत:आला त्याने आपल्या सहस्त्र बाहुंनी एकदम पाचशे धनुष्य बाण सज्ज केले व भगवंतांवर एकावेऴी पाचशे बाण सोडले. भगवान परशुराम सर्व शस्त्रास्त्र पारंगत असल्याने त्यांनी ते सर्व बाण आपल्या एकाच धनुष्याने नष्ट केले..
सहस्त्रार्जुनाची धनुष्ये व शस्त्रे तोडुन टाकली.
त्यानंतर सहस्त्रार्जुनाने मोठे मोठे दगड, वृक्ष उपटुन टाकायला सुरुवात केली.भगवान परशुरामांनी तेवढ्यात विद्युत चपऴाईने सहस्त्रार्जुनाचे हात परशूने छाटायला सुरुवात केली.त्या नंतर त्या दोघांमध्ये तुंबऴ युध्द सुरु झाले भगवंतानी त्याचे सहस्त्र बाहु छाटले व शेवटि भगवंतांनी आवेशाने त्याचे मस्तक छाटुन टाकले सहस्त्रार्जुन भूमीवर कोसऴला त्याच्या दहा हजार पुत्रांपैकी जवऴपास सर्व पुत्र मारले गेले केवऴ पाच पुत्र जीव वाचवण्याकरता हिमालयात पऴुन गेले तेवढेच बचावले गेले.
भगवान परशुराम सवत्स कामधेनु घेवुन आश्रमात परतले.गोमाता अत्यंत दु:खमग्न होती.
भगवान श्री परशुरामांनी सर्व वृत्तांत जमदग्नी व आपल्या बंधुंना सांगीतला.
भगवंतांनी १७ अक्षौहणी सैन्यासह सहस्त्रार्जुनास संपवला.वास्तवात भगवान परशुराम व सहस्त्रार्जुन हे दोन्हि परम दत्तभक्त, दोघेजण सर्वसिध्दि अस्त्र शस्त्र युक्त होते तरी पण या युध्दात भगवान श्री परशुराम विजयी झाले याचे कारण ते सत्यमार्गाने व शास्त्रानुसार वर्तन करणारे होते.दत्तमहाराजांनी या युध्दात हस्तक्षेप करुन सहस्त्रार्जुनाचे प्राण वाचवले नाहित याचे कारण त्याने आपल्या सिध्दि अयोग्य कारणाकरता वापरल्या होत्या दत्तमहाराज सदैव सत्य व न्यायाचा कैवार घेतात व त्याच बाजुने ठाम उभे राहतात .
जमदग्नींनी हे युध्द वर्णन व महाभयंकर संहार वर्णन ऐकले .एक औक्षहणी म्हणजे नक्कि किती सैन्य असते?किती सैन्य संहार झाला असेल हे ऐकुन जमदग्नींची यावर प्रतिक्रिया काय होती हे आपण पुढिल भागात पाहु.
तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
VengurlabhushanGmail.com