DevDharm —


चैत्र शु.६ गुरुवार
११ अेप्रील २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु
काल आपण सहस्त्रार्जुन वध प्रकरण पाहिले आज पुढे भगवान श्री परशुराम १७ अक्षौहिणी सैन्यासह सहस्त्रार्जुनाचा वध करुन जमदग्नींकडे सवत्स कामधेनुला घेवुन परत आले. अक्षौहिणी हि संख्येची गणना आहे .
काहि पुराणे व महाभारतात याबद्दल थोडा भेद आहे .महाभारतातली गणना अधीक सटिक व विस्तृत आहे त्यामुऴे आपण ती पाहु
२१८७० एकवीस हजार आठशे सत्तर रथ
२१८७० हत्ती
६५६१० पासष्ट हजार सहाशे दहा घोडेस्वार
१०९३५० एख लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदऴ सैनिक
या सर्वांना एक अक्षौहिणी संबोधतात.
यात आणखी एख गंमत आहे प्रत्येक संचातल्या अंकाची एकुण बेरीज १८ होणे आवश्यक आहे.
हत्तीवर माहुत व एक योध्दा असे रथामध्ये एक रथी (योध्दा) व एक सारथी असे.
सहस्त्रार्जुनाची एकट्याची सेना हि १७ अक्षौहिणी होती.
(महाभारतात कौरव पांडव दोघांचे मिऴुन १८ अक्षौहिणी सैन्य होते) यावरुन सहस्त्रार्जुनाचे साम्राज्य व सामर्थ्याचा अंदाज येईल.
महाभारतात परस्परांशी अनेक योध्दे रथी महारथी लढले तेव्हा १८ अक्षौहिणी सैन्य मृत झाले .
भगवान परशुरामांनी एकट्याने १७ अक्षौहिणी सैन्याला कापुन काढले यावरुन भगवंतांच्या प्रचंड आवेश वेग सामर्थ्य व पराक्रमाचा अंदाज घेवु शकता.
एवढा संग्राम घडल्यावर जमदग्नींनी भगवान श्री परशुरामांना उपदेश केला.
राजा हा देवाचे रुप आहे त्याचा वध करणे हे योग्य नाहि.क्षमा हा ब्राह्मणांचा गुण विशेष आहे (भागवत महापुराण) जमदग्नी हे शिवशंकरांचे अंश होते रेणुका माता ह्या साक्षात पार्वती देवीचा अंश होत्या.
जमदग्नींनी या घोर संहाराचे प्रायश्चित्त म्हणुन भगवान श्री परशुरामांना १२ वर्षे तपश्चर्या करावी अशी आज्ञा केली. पितृआज्ञेनुसार भगवान परशुरामांनी प्रायश्चित्त तपश्चर्येचा आरंभ केला.
आणी काहि काऴ लोटताच एक महाअनर्थ घडला.
भगवान श्री परशुराम वनात यज्ञाकरता समिधा आणण्याकरता गेले असता सहस्त्रार्जुनाच्या पाच पुत्रांनी (जे हिमालयात पऴुन गेले होते) डाव साधला आणी ध्यानमग्न जमदग्नींवर २१ वार करुन त्यांची हत्या केली व ते आश्रम उध्वस्त करुन पऴुन गेले.
यानंतर काय भयंकर प्रसंग उद्भवला हे आपण पुढे पाहु.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com