चैत्र कृ.९ रविवार
२८ एप्रील२०१९
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.
परवा आपण रेणुका माता व माहुर स्थानाबद्दल जाणुन घेतले आता पुढे.
भगवान श्री परशुरामांनी दत्तमहाराजांचे आशीर्वाद घेतले व दुष्ट क्षत्रियांचा वध करण्यास शस्त्रसज्ज झाले.
भगवान परशुरामांनी कधीच प्रजापालन तत्पर व सज्जन राजांवर आक्रमण केले नाहि किंवा त्यांचा वध देखील केला नाहि.
रघुवंशातले दशरथ राजा, मिथीलेतले जनक राजा अशी अनेक सज्जन प्रजापालक राजघराणी भगवान श्री परशुरामांच्या समकालीन होती यांना भगवंतांनी कधीच त्रास दिला नाहि किंवा त्यांचावर आक्रमण देखील केले नाहि जनक राजावर भगवंतांचे विशेष आशीर्वाद पर वात्सल्यप्रेम होते.
वाल्मिकी रामायणात वाल्मिकींनी भगवान श्री परशुरामांचा उल्लेख दुष्ट राजांचे मर्दन करणारे असाच केलाय
भगवंत हे अविचारी किंवा अविवेकी कधीच वागत नाहित जर त्यांनी सरसकट पहिल्याच वेऴी सर्व क्षत्रीयांचा वध केला असता तर मग दुसर्या वेऴेस वध करण्यास क्षत्रीय राहिले असते का? नाहि ना
याचाच अर्थ भगवंतांनी सरसकट क्षत्रियांचा वध केला नाहि जे नालायक लोक भगवंतांनी गर्भातले क्षत्रीय देखील परशुरामांनी मारले हा अपप्रचार करतात त्यांना आपण विचारले पाहिजे कि मग दुसर्या वेऴेपासुन ते २१ वेऴापर्यंत भगवंतांनी जे क्षत्रिय मारले ते निर्माण कसे झाले? जर प्रथम वेऴेसच सर्व क्षत्रिय वर्ण नष्ट केला असता तर मग पुढे २१ वेऴा दुष्टांचा संहार केला हे घडलेच नसते.
एखादा वर्ण निर्माण अथवा नष्ट करणे हे केवऴ अनुक्रमे सृष्टि आरंभी व प्रलयकाऴी घडते तो पर्यंत हे करणे सृष्टिनियमाच्या विरुध्द असते परमेश्वर कधीच सृष्टिचा नियमभंग करत नाहित.
भगवान परशुरामांनी केलेला दुष्टांचा संहार हा अविचारी नव्हता तर ते विवेकानेच केलेले दुष्टांचे निर्दालन होते.
भगवान श्री परशुरामांनी विविध प्रांतातल्या अविचारी दुष्ट राजांशी घनघोर युध्दे केली व त्यांचे वध केले. प्रजाजनांना भयमुक्त केले अंगी पराक्रम सामर्थ्य व विद्वत्ता असुन देखील भगवंतांनी यातल्या एकाहि राज्यावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली नाहि हाच त्यांचा विवेक होता.
दुष्ट निर्दालन झाल्यावर योग्य प्रजापालक क्षत्रीय उत्तराधिकारीच त्यांनी नेमले
दुष्टांचा महासंहार एकदा घडवला कि भगवान श्री परशुराम पापक्षालन तपश्चर्ये करता निघुन जात १२ वर्षांपेक्षा अधीक तप झाले कि पुन्हा ते पृथ्वीवरील दुष्टांचा वध करत (साधारण पणे १२ ते १५ वर्षे हा काऴ हा एका पिढिचा वैचारीक परिवर्तनाचा मानला जातो याच काऴात राजास सत्ता, संपत्ती व सामर्थ्याचा माज येवु शकतो सत्ताधारी हा अनिर्बंध वागु शकतो काहि सन्मानीय अपवाद याला असतात जे सत्ता सामर्थ्य व संपत्ती यांच्यापेक्षा कर्तव्यास महत्व देतात ते जनक किंवा दशरथा प्रमाणे राजर्षी असतात)
भगवान श्री परशुरामांनी "परित्राणाय साधुनाम् विनाशाय च दुष्कृताम् "या वचनानुसार च सज्जनांच्या रक्षणाकरता दुष्टांचा वध केला हेच सत्य आहे .
जेव्हा राजसत्ता अनिर्बंध वागते तेव्हा प्रसंगी राजास धर्मदंड देणे हे आचरणसंपन्न ब्राह्मणाचे परम कर्तव्यच आहे.
पुराणात वेन राजासारखी अशी काहि उदारणे देखील आहेत जेथे धर्मसभेने दुष्ट राजास देह दंड ठोठावला होता पण धर्मसभेने राज्य मात्र स्वत:हाती घेतली नाहित योग्य उत्तराधिकारी नेमुन त्याचाकडे राज्य सोपवुन धर्मसभा सत्ता संपत्ती व सामर्थ्य यापासुन बाजुला राहिली
भगवान श्री परशुराम हे या करताच आदर्श आहेत.अंगी पराक्रम असुन देखील ते कधीच कोणत्याहि राज्यपदावर आरुढले नाहित.
जनक राजाला त्यांनी आपले धनुष्य दिले होते.
भिष्मांना त्यांनी शस्त्रास्त्र विद्या पारंगत केले होते याचाच अर्थ सर्वच क्षत्रियांशी त्यांचे वैर नव्हते हाच होतो.
तेव्हा भगवान श्री परशुरामां बद्दल हेतुपुरस्सर पसरवलेले गैरसमज सोडावेत हिच विनंती
राजाचे कर्तव्य काय हवे? कोणत्या राजाला दंड ठोठावला पाहिजे? या विषयी शास्त्रवचन संदर्भ पुढिल भागात पाहु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com