वैशाख शु.१४शुक्रवार
१७ मे २०१९
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
मधल्या काऴात माझ्या प्रचंड व्यस्तते मुऴे मी लेखमाला देवु शकलो नाहि त्या बद्दल क्षमस्व
मागील भागात आपण भगवान परशुरामांनी २१ वेऴा पृथ्वीवरील केवऴ दुष्ट क्षत्रियांचाच संहार केला हे सप्रमाण पाहिले आता पुढे पाहु.
भगवंतांनी २१ वेऴा दुष्ट राजांचेच निर्दालन केले हा संहार महाभयंकर होता पाच सरोवरे रक्ताने भरली होती. भगवान परशुरामांनी त्या सरोवरांच्या काठावर जमदग्नी व रेणुका मातेकरता तर्पण केले व आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.
भगवान श्री परशुरामांनी या नंतर एक मोठा यज्ञ आरंभला.देवता वैदिक ब्राह्मण, ऋषिमुनी, तपस्वी अनेकजण या यज्ञाकरता आले.
काश्यप ऋषि देखील या यज्ञात विशेष निमंत्रीत होते.भगवान परशुरामांनी यज्ञ सांगता झाल्यावर विविध ऋषिंना दानधर्म केला व काश्यपांना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान दिली. (शब्दश:अर्थ येथे घेवु नये कारण याच काऴात विश्वामित्र, जनक, दशरथ असे राजे किंवा त्यांचे पूर्वज न्यायमार्गाने राज्यकरत होतेच त्यांच्यावर भगवंतांनी आक्रमण केल्याचा उल्लेख नाहि.
त्यामुऴे ज्या दुष्ट राजांचा भगवंतांनी वध केला होता त्या राज्यांचे दान त्यांनी काश्यपांना दिले असा अर्थ येथे घ्यावा)
अंगी पराक्रम, सामर्थ्य, विद्वत्ता असुन देखील भगवान परशुरामांनी यातल्या एकाहि राज्यावर आपली सत्ता स्थापली नाहि तर त्यांनी हि सर्व राज्ये काश्यपांना दान दिली.
पुढे काश्यपांनी देखील या राज्यांवर योग्य राजे नेमले व या राज्यांची व्यवस्था लावुन दिली.
शास्त्रकारांनी ब्राह्मणांची सहा प्रधान कर्तव्ये सांगीतली आहेत
१ अध्ययन - शिक्षण घेणे
२ अध्यापन - विद्यार्थ्यांना शिकवणे
३ यजन - स्वत: देवता व अग्नि उपासना करणे
४ याजन - यजमानांकरता पूजन अर्चन व यज्ञ याग करणे
५ दान - स्वत:दान देणे
६ प्रतिग्रह - योग्य व्यक्तिकडुन दान स्विकारणे.
भगवान परशुरामांनी हि षट्कर्मे पूर्ण केली आहेत.
भगवंतांचे चरीत्र हे दिव्य व अलौकिकच आहे .
भारतवर्षात "धर्मसंस्थेने " कधीच राज्यसंस्थेत हस्तक्षेप करुन राज्य बऴकवल्याचे उदारण नाहि.
धर्मसंस्थेने राजाचे वागणे चुकत असेल तर त्याला उपदेश किंवा अपवादात्मक स्थितीत दंड ठोठावला आहे.
परंतु कोठेहि राज्य बऴकावले नाहि हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
ओघात विषय आलाय तर दानाचे महत्व काय असते हे दोन श्लोकात सांगतो.
सनातन वैदिक धर्मात मनुस्मृतित "प्रवृत्ति व निवृत्ति धर्म "असे दोन प्रकार वर्णन केले आहेत.
भागवत महापुराणात देखील
प्रवृत्तं च निवृत्तंच द्विविधं कर्म वैदिकम् ।
आवर्तेत प्रवृत्तेन निवृत्तेनाश्नुतेऽमृतम् ।। (7-15-47)
प्रवृत्ति व निवृत्ति या दोन लक्षणांचा उल्लेख आहे.
आहार, निद्रा, भय व मैथुन या चार गोष्टि मानव व प्राण्यांमध्ये समान असतात. पण निवृत्ति धर्म हा मानवाला लाभलेली देणगी आहे.उदा.देतो.
भुक लागल्यावर भोजन करणे हि प्रकृती आहे
मी माझ्या वाट्याचे अन्न ग्रहण केले व दुसर्याचे हि अन्न लुबाडले हि विकृती आहे.
वेऴप्रसंगी मी चार घास कमी खावुन ते दुसर्या गरजवंताला देणे हि संस्कृती आहे.
भुक लागणे हि यातला प्रवृत्ति धर्म आहे व माझ्यातले चार घास अन्य गरजवंतास देणे हि निवृत्ति धर्म आहे.
दान हा निवृत्ती धर्म जाणावा.
आता दान संकल्पनेला काय गोष्टि आवश्यक असतात ते पाहु.
दाता प्रतिगृहीता च श्रध्दा देयं च धर्मयुक् ।
देशकालौ च दानानाणङ्गान्येतानि षड् विदु:।।
दाता, दान घेणारा, श्रध्दा, धर्मयुक्त देयवस्तू, देश व काल हि सहा अंगानी युक्त दा म्हणजे देणे या वरुन दान हा शब्द निर्माण झाला आहे.
1-दान देणारा दाता
2-दान घेणारा गरजवंत व सत्पात्री याचक (हा शब्द महत्वाचा आहे.दारु पिण्याकरता मद्यप्याला द्रव्य दिल्याने दानाचे पुण्य लाभणार नाहि उलट पापच लागेल. दान घेण्याकरता करता योग्य गरजवंत पाहणे गरजेचे आहे)
3- श्रध्दा - दान देणार्याची व घेणार्याची श्रध्दा त्यावर असणे गरजेचे आहे (ती नसेल तर दान निष्फळ ठरते कसे तेहि सांगतो.)
4-देय वस्तु - जी वस्तु किंवा गोष्ट आपण दुसर्याला देणार ती चांगलीच असली पाहिजे.नको झालेली किंवा खराब वस्तु देणे हे दानात येत नाहि. (खेऴण मोडल म्हणुन गरीबाला देणे हे दानात येत नाहि.शर्ट फाटला म्हणुन भिकार्याला दिला तो दानात येत नाहि.)
5 देश - योग्य प्रांतात योग्य वस्तु दान दिली पाहिजे (काश्मिर मधे राजस्थान प्रमाणे सुती सैल कपडे देणे हे अयोग्य ठरेल.तसच राजस्थानतल्या माणसाला काश्मिर प्रमाणे गरम कपडे देणे हेहि अयोग्य आहे.या करता देश व प्रांतास अनुसरुन दान द्यावे)
6 - काल - योग्य काऴी योग्य वस्तु दान देणे हे संयुक्त असते. उदा.हिवाळ्यात गरीबाला छत्री दान दिली तर ते व्यर्थ दान ठरेल ती पावसाऴ्यात देणे गरजेचे आहे .कांबळे (ब्लँकेट) हे थंडित दान देणे संयुक्त ठरते कारण त्यावेऴी ते उपयुक्त ठरु शकते.पण ते जर उन्हाऴ्यात दिले तर व्यर्थ नाहि का?
या सहा गोष्टिंचा विचार करुन मगच दान द्यावे.
न्याय कोश नामक ग्रंथात भीमाचार्य दान शब्दाची व्याखा करताना विस्तृत पणे म्हणतात
मुल्यग्रहणं विना स्वस्वत्वध्वंस परस्वत्व जनक:त्याग:।
आपला हक्क कमी करुन तिथे दुसर्याची मालकी निर्माण करणे म्हणजे दान
दुसरा व्यक्ति हा सत्पात्री हवा दाता व दान घेणारा यांची श्रध्दा व धर्मयुक्त देयवस्तु, देश व काल म्हणजे योग्य काऴी व योग्य वेऴी योग्य वस्तु देणे हे दानात येते
नित्यं नैमित्तिकं काम्य असे दानाचे प्रकार आहेत
भगवान परशुराम पृथ्वीचे दान दिल्यानंतर विरक्त अवस्थेत गेले .जे आपण दान दिले तेथे आता आपण राहणे संयुक्त नाहि त्या भूमीवर आपला आता अधिकार नाहि हा शास्त्रविचार त्यांनी अंगीकारला व आपल्या आश्रमाकरता योग्य स्थान ते पाहु लागले.
भगवान परशुरामांनी निवृत्ती धर्म श्रेष्ठ मानला व सर्वदान देवुन रिक्त झाले.
भगवंतांवर जे लोक टिका करतात ते हा चरीत्र भाग मुद्दाम दुर्लक्षीत करतात. भगवंतांनी जिंकलेली सर्व राज्ये काश्यपांना दान दिलीत.
ब्राह्मणांचे कर्तव्य अध्यापन करावे हा विचार करुन त्यांनी आश्रमाकरता योग्य जागा शोधण्यास सुरुवात केली.
आता आपल्याला या दान दिलेल्या भूमीवर राहण्याचा अधिकार नाहि यास्तव नवीन भूमी निर्माण करावी या करता भगवान श्री परशुराम सज्ज झाले मग पुढे त्यांनी काय केले? हे पुढिल भागात पाहु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com