सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढेे पाहु.
काल आपण श्री.धनंजय चितळे यांचा लेख पाहिला.आज पुढे पाहु.
भगवान परशुरामांच्या अवतारकार्यातला दुष्ट क्षत्रिय निर्दालन हा महत्वाचा भाग पूर्ण झाला होता आता उर्वरीत आयुष्य हे तपाचरण व अध्यापनाकरता दिले पाहिजे म्हणुन यज्ञ करुन काश्यपांना पृथ्वी दान दिल्यानंतर यज्ञाकरता आलेल्या ऋषिमुनींनी परशुरामांना सांगीतले दान दिलेल्या गोष्टिवर आपला अधिकार संपतो त्यामुऴे आता या भूमीवर तुमचा अधिकार नाही त्यामुऴे इथे वास्तव्य करणे हे आता शास्त्रबाह्य ठरेल .भगवान श्री परशुरामांनी हि आज्ञा शिरसावंद्य मानली व त्यांनी नवीन भूमी निर्माण करण्याचा संकल्प केला व महेंद्र पर्वतावर उभे राहुन समुद्राची प्रार्थना केली व त्याला मागे हटण्याची विनंती केली समुद्राने हि विनंती अमान्य केल्याने भगवंतांनी महेंद्रपर्वतावरुन बाण सोडुन समुद्र मागे हटवला. ज्या ठिकाणी हे बाण पडले त्या त्या स्थानांना #बाणगंगा नाम प्राप्त झाले व तीर्थक्षेत्र रुपाने या बाणगंगा प्रसिध्द झाल्या.समुद्र व सह्याद्रि पर्वत या दोघांच्या मधे जो भूभाग निर्माण झाला ती भूमी म्हणजे कोकण.
भगवंतांनी हि भूमी केवऴ स्वत:च्या वास्तव्याकरता वसवली नाही तर या ठिकाणी अनेक ऋषि, वैदिक ब्राह्मण, तपोनिधी मंडऴींना वास्तव्यास बोलवले. व हि भूमी #तपोभूमी म्हणुन प्रसिध्द झाली.नवनाथांपैकी मत्स्येंद्रनाथ वगैरे नाथ मंडऴींनी देखील या भूमीवर तपश्चर्या केली आहे.
अगदि अलीकडच्या काऴात देखील प.प.टेंब्ये स्वामी, राऊऴ महाराज, साटम महाराज, भालचंद्र महाराज, सोहिरोबानाथ अशा अनेक संतमंडऴी,अवलिया, सत्पुरुषांनी याच भूमीवर जन्म घेतला इथेच तपाचरण केले अनेक चमत्कार केले लोकांना भक्तिमार्गास लावले याचे कारण म्हणजे हि भूमी प्रत्यक्ष भगवान श्री परशुरामांनी संकल्प पूर्वक तप:साधनेकरता निर्माण केली आहे.
#कोकण_भूमी हि प्रत्यक्ष देव भूमी आहे.
हल्ली भारतासह काहि देशांत मानवाने समुद्र हटवुन भूमी निर्माण केली या निर्माण केलेल्या भूमीवर ठरावीकच झाडे उगवतात व ठरावीक प्राणी तिथे राहतात परंतु भगवंताने निर्माण केलेल्या कोकणात मात्र विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे, झुडुपे वेली अशी वनस्पतींची प्रचंड विविधता आढऴते.वाघा पासुन हत्ती पर्यंत विविध प्राणी, विविध सरपटणारे प्राणी, किटक आढऴतात विविध जैवविविधता कोकणातच आढऴते.जी मानव निर्मित भूमीवर आढऴत नाही.
भगवंताने सृष्टि निर्माण करायची ठरवली की तो संकल्प करतो व विविध प्रकारची सृष्टि निर्माण करतो.या विषयी अधीक विवेचन भागवत पुराणात आलेय .कोकण भूमी हि तशीच भगवंतांच्या संकल्पानेच निर्माण झाली असल्याने हि तपोभूमी आहे इथे केलेले तप, नामस्मरण हे कधीच व्यर्थ जात नाही.
भगवान श्री परशुरामांनी आपल्या अवतारातील क्षात्रकार्य पूर्ण करुन ब्राह्मतेज वृध्दिंगत व्हावे तपाचरण घडावे या करता हि भूमी निर्माण केलीय
#संकल्पात_सिध्दि: या वचनानुसार सत्य संकल्प मनी धरुन हि सिध्द भूमी निर्माण झाली.
#श्रावण_कृ_त्रयोदशी तिथीस #सायंकाऴी भगवंतांनी हि भूमी निर्माण केली.
भगवान परशुरामांनी या भूमीच्या रक्षणाकरता व या भूमीस आशीर्वाद प्राप्तीकरता विविध देवतांचे आवाहन या भूमीवर केले आहे .आजही या देवतांचे या भूमीवर वास्तव्य आहे असे अनेक तपस्वी अधिकारी मंडऴींनी सांगुन ठेवले आहे त्यामुऴे कोकणात वास्तव्य करणे हे प्रत्यक्ष देवभूमीवर राहण्याप्रमाणेच आहे

तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com