DevDharm —


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.
मागील भागात भगवंतांनी संकल्प पूर्वक तपस्येकरता कोकण भूमी निर्माण केली या विषयी पाहिले आता पुढे
(कोकण भूमीचे वैशिष्ट असणारा पश्चिम घाट हा युनेस्को ने जागतीक दर्जाचा मानला आहे .या घाटातली जैव विविधता व वनस्पतींची विविधता यावर डिस्करव्हि चँनेल व इंटरनेटवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे .समुद्र हटवुन भूमी निर्माण करणे व एवढि विविधता निर्माण करणे हे केवऴ भगवंताचेच कार्य असु शकते हे मानव निर्मित असणे कदापी शक्य नाही त्यामुऴे वेऴ झाल्यास इंटरनेटवर पश्चिम घाट जो परशुराम भूमी चा भाग आहे.या बद्दल नक्की जाणुन घ्यावे हि विनंती) भगवान परशुराम हे #आवेश_अवतार असल्यामुऴे त्यांच्या ठायी प्रचंड आवेश होता.ब्राह्मतेज व क्षात्रतेज या दोघांचा परमोच्च बिंदु हे भगवान श्री परशुराम होते या आवेशामुऴेच कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा ससैन्य पराभव करुन वध व २१ वेळा पृथ्वीवरील दुष्ट राजांचे निर्दालन भगवंतांनी केले त्या नंतर काश्यपांना पृथ्वी दान देवुन महेंद्र पर्वतावर ते तपश्चर्येकरता व अध्यापना करता वास्तव्य करते झाले.मधे बराच काऴ लोटला होता परशुराम अवतार हा १९ व्या त्रेतायुगातला होता त्या नंतर भगवान महाविष्णुंनी #मर्यादा_पुरुषोत्तम_राम अवतार धारण केला.त्यामुऴे पृथ्वीवर भगवंताचे हे दोन सामर्थ्यवान अवतार कार्यकरण्याकरता अवतरले होते.
श्रीरामांच्या अवतार कार्याचा हेतु दुष्टांचे निर्दालन व भक्तांचा उध्दार हे दोन्हि साध्य करायचे असल्यास भगवंतांजवऴ पूर्ण पणे वैष्णवी शक्ती व पूर्ण पराक्रम शक्ती व आवेश असणे अत्यावश्यक होते त्यामुऴे भगवान परशुरामांच्या ठायी असलेला हा आवेश व पराक्रम व तेज हे श्रीरामांकडे संक्रमीत होणे अत्यावश्यक होते.
भगवान परशुरामांचे दुष्ट निर्दालन कार्य समाप्त झाल्याने त्यांना आता या आवेशाची तेजाची व शक्तीची आवश्यकता नव्हती व पृथ्वीचे पालन करण्याकरता आता सप्तम अवतार श्रीराम अवतरले होते त्यामुऴे आता पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी श्रीरामांची होती त्यामुऴे या पुढिल अवताराकडे हा आवेश व वैष्णवी शक्ती सुपुर्द करण्याकरता एक कारण घडले.
ते कारण काय होते? नक्की काय घडले ते उद्या पाहु.
तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com