DevDharm —


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.
भगवान परशुरामांनी काश्यपांना पृथ्वी दान देण्यापूर्वी यज्ञ केले हे आपण पाहिले होते या यज्ञाचे फऴ म्हणुन जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली व भगवान परशुरामांकडुन सन्मानित होवुन ते सप्तर्षींच्या मंडऴात सातवे ऋषी झाले. व भगवान परशुराम हे पुढिल मन्वंतरात सप्तर्षींच्या मंडऴात राहुन वेदविस्तार करतील असा आशीर्वाद भगवान परशुरामांना मिऴाला (भागवत महापुराण ९-१६-२२ व २३) मागील भागात आपण पाहिले की त्रेतायुगात भगवान #श्रीराम_अवतरीत झाले व त्यांच्याकडे श्री परशुरामांचा आवेश, वैष्णवी शक्ती व सामर्थ्य श्रीरामांकडे सूपूर्द करण्याकरता एक कारण घडले ते म्हणजे #श्रीराम_सीता_विवाह. जनक राजाकडे शिव धनुष्य होते .
हे धनुष्य शंकरांनी दक्षयज्ञाचा विध्वंस केल्यावर देवतांकडे दिले त्यानंतर देवतांनी ते धनुष्य देवरात राजाकडे (जनकाचा पूर्वज) सांभाऴण्याकरता दिले. जनक राजा जेव्हा यज्ञाकरता भूमी नांगरत होते.तेव्हा त्या नांगरलेल्या रेषेतुन एक कन्या प्रकटली ती म्हणजे #सीता.
या #अयोनिज कन्येच्या विवाहाकरता जनक राजाने एक अट निश्चित केली होती ती म्हणजे जो आपल्या पराक्रमाने या शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवेल त्याला हि कन्या देईन.
वाल्मिकी रामायणात #वीर्यशुल्का (पराक्रमास संस्कृत मध्ये वीर्य असा शब्द आहे.पराक्रम हेच शुल्क मानुन ) असे विशेष संबोधन सीतेकरता आलेय.
#सीतेचे_स्वयंवर_झाले_नव्हते. (स्वयंवर या शब्दाचा अर्थ स्वयं म्हणजे स्वत: मुलीने निवडलेला वर) इथे श्री रामांनी जनक राजाने ठेवलेला पण पूर्ण केला धनुष्याला प्रत्यंचा चढवताना हे धनुष्य मधुनच तुटले व त्यानंतर सीतेचा विवाह श्री रामांशी झाला.
हे धनुष्य पाच हजार सैनिक कसेबसे उचलुन आणत असे वाल्मिकी रामायणात वर्णन आलेय.अेवढे मोठे श्रेष्ठ शिवधनुष्य रामांनी प्रत्यंचा लावताना मोडले.
हि बातमी महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या भगवान श्री परशुरामांना कळली तो पर्यंत श्री राम व त्यांच्या अन्य बंधुंचे विवाह संस्कार संपन्न झाले होते.
आपल्या गुरुचे म्हणजे श्री.शंकरांचे धनुष्य कोणी मोडले कोणी हे दु:साहस केले त्याला दंड द्यावा हा कोण पराक्रमी आहे हे पाहावे या हेतुने भगवान परशुराम क्रुध्द होवुन परशु घेवुन निघाले पुढे काय घडले राम व परशुरामात युध्द झाले का?युध्दात नक्की कोण जिंकले कोण हरले? हे पुढिल भागात पाहु.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com