सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
मागील भागात श्री परशुरामांचा आवेश क्रोध व तेज श्री रामांच्या ठायी येण्याकरता एक लीला नाट्य रंगलेले पाहिले श्री राम व श्री परशुरामांमध्ये युध्दजन्य स्थिती निर्माण झालेली पाहिली व त्या अनुषंगाने शिव धनुष्य व वैष्णव धनुष्य निर्माण कथा पाहिली आता पुढे
श्री रामांनी भगवान परशुरामांना नम्रतापूर्वक नमस्कार केला व भगवान परशुरामांनी दिलेल्या आव्हानानुसार श्रीरामांनी दिव्य व महाप्रचंड वैष्णव धनुष्य सहज पणे उचलले त्यावर प्रत्यंच्या चढवली व त्यावर दिव्य बाण लावला व हा बाण कोठे सोडु ते सांगा ? असे श्री परशुरामांना विचारले. ब्रह्मादिक सर्व देवता यक्ष गंधर्व किन्नर वगैरे सर्वजण हे अद्भुत दृश्य पाहण्याकरता आले होते.
आपण विद्वान ब्राह्मण आहात व विश्वामित्रांचे नातेवाईक आहात त्यामुऴे हा अमोघ बाण मी आपल्यावर सोडु शकत नाही त्यामुऴे एक तर तुम्हि #तपोबलाने_प्राप्त_केलेल्या_पुण्यलोकांवर हा बाण मी सोडु अथवा #शीघ्रतापूर्वक_कोठेही_संचार_करणार्या_आपल्या_शक्तीचे_सामर्थ्य या बाणाने नष्ट करु ?असा प्रश्न श्री रामांनी भगवान परशुरामांना केला.हा वैष्णव बाण आता निष्फऴ होणार नाही.
#वैष्णव_धनुष्य परशुरामांकडुन घेतानाच श्री रामांनी श्री परशुरामांचे तेज व सामर्थ्य काढुन घेतले होते त्यामुऴे ते निस्तेज व जडवत् वीर्यहीन दिसु लागले.त्यामुऴे भगवान परशुरामांनी श्री रामांना सांगीतले
मी पृथ्वी काश्यपांना दान दिली त्यामुऴे मी रात्री पृथ्वीवर वास्तव्य करु शकत नाही हि प्रतिज्ञा मी आजदेखील पाऴतो त्यामुऴे मी आता शीघ्र महेंद्र पर्वतावर निघुन जाईन. माझा हा #मनोवेग तु नष्ट कर व त्याच सोबत मी तपाचरणाने प्राप्त केलेले #दिव्य_लोक तु या बाणाने नष्ट कर असे श्री परशुराम म्हणाले
श्री रामांनी हा अमोघ दिव्य बाण सोडला व परशुरामांचे तपोबल नष्ट केले.श्री परशुरामांचा आवेश, वैष्णवी शक्ती सर्व श्री रामांकडे संक्रमीत झाली होती.भगवान परशुरामांचे पूजन श्री रामांनी केले.दहा दिशांतला अंध:कार दूर झाला होता.
सर्वांनी श्री रामांचा जयघोष केला.श्री परशुरामांनी श्री रामांना प्रदक्षिणा केली व महेंद्र पर्वतावर निघुन गेले.दशरथ राजाने हे वैष्णव धनुष्य वरुण देवतेकडे दिले (वाल्मिकी रामायण)
महाविष्णुंचा सातवा अवतार श्रीरामांना पुढिल काऴात महाबलशाली दैत्यांना मारण्याकरता शक्ती तेज व आवेश प्राप्त व्हावा या करता ही लीला रचली गेली
भगवान श्री परशुरामांचे चरीत्र हे अत्यंत दिव्य आहे आवेश पूर्ण आहे.
भगवान परशुरामांनी जेव्हा पृथ्वीवरील दुष्ट क्षत्रिय राजांचे निर्दालन केले होते त्याचा धसका घेवुन अनेक हैहय वंशी क्षत्रियांनी पलायन केले होते.
काहिंनी स्त्री वेश धारण केला तर काहि जण वनात लपले.
पौरव कुलांतील विद्रथपुत्र "ऋक्षवान "अरण्यात व प्रतर्दन पुत्र "वत्स " अस्वलांच्या सानिध्यात राहिले.गृधकुट पर्वतावर "बृहद्रथ " याचे वानरांनी रक्षण केले होते.इंद्राप्रमाणे तेजस्वी मरुत राजे समुद्राच्या काठी राहिले
अनेक ब्राह्मणांनी क्षत्रिय राजांचे रक्षण केले सौदासाचा पुत्र "सर्वकर्मा " हा पाराशर ऋषिंनी रक्षिला , दधिवाहनाच्या नातवाचे व शिबिरथ पुत्राचे गौतम ऋषिंनी पालन केले .
भगवान परशुरामांनी केवऴ दुष्टांचाच नाश केला होता तो महाभयंकर असल्याने हि मंडऴी घाबरली होती श्री परशुरामांनी निर्लोभ व परम तपस्वी काश्यपांना पृथ्वी दान दिल्यावर या सर्व क्षत्रियांना व त्यांच्या वंशंजाना काश्यपांनी पुन्हा राज्यावर बसवले राज्यांची व्यवस्था नीट लावुन दिली व धर्माचरण पालन करुन न्यायमार्गाने प्रजापालनाचा उपदेश केला
भगवान परशुराम व काश्यप ऋषि हे दोघे निर्लोभ होते निस्वार्थी होते.अंगी पराक्रम सामर्थ्य तपोबल असुन अनुक्रमे जिंकलेल्या व दान मिऴालेल्या राज्यातल्या संपत्ती सत्ता यावर त्यांनी कधीच हक्क दाखवला नाही ती पुन्हा योग्य मंडऴींकडे योग्य वारसदार क्षत्रियांकडेच सोपवली होती
पुढिल भागात श्री परशुरांमाची एक वेगऴी कथा पाहु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com