DevDharm —


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.काल आपण श्री रामांनी परशुरामांचा आवेश काढुन घेतला हि लीला पाहिली आज पुढे
भगवान श्री परशुराम महेंद्र नामक कुलपर्वतावर तप:साधनेकरता आले.(कुलपर्वत म्हणजे मुख्य पर्वत ते सात आहेत महेंद्र, मलय,सह्य, शुक्तिमान, ऋक्षपर्वत, विंध्य व व पारियान) भगवान परशुरामांच्या अवतार कार्यातला #क्षात्रतेजाचा_भाग पूर्ण झाला होता.आता ब्राह्मणांचे परम कर्तव्य म्हणजे #अध्यापन करावे या हेतुने महेंद्र पर्वतावर श्री परशुराम आश्रम बांधुन राहिले .भगवंतांनी अनेक शिष्य घडवले अनेकांना युध्द कला, राज्यशास्त्र, धनुर्विद्या, वेदविद्या शिकवली. द्रोणाचार्य, भीष्म, अकृतव्रण असे त्यांचे अनेक शिष्य होते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे परशुराम हे शस्त्रास्त्र गुरु होते त्यांनी #मोक्ष_गुरु म्हणुन कोणालाही उपदेश दिलेला नाही.
नाथ संप्रदायातल्या काही नाथ मंडऴींना देखील परशुरामांनी काहि विद्या दिल्याचे उल्लेख आढऴतात . कर्णाने देखील त्यांना आपण क्षत्रिय आहोत असे खोटे सांगुन धनुर्विद्या अवगत केली पुढची कथा आपण जाणताच भगवान परशुरामांनी कर्णास #सुतपुत्र_म्हणुन_शाप_दिलेला_नव्हता तर त्याने #खोटे_बोलुन_विद्या_प्राप्त_केली म्हणुन परशुरामांनी त्याला शाप दिला होता.
भगवान श्री परशुराम हे क्रूर नव्हते तर त्यांना असत्य व अन्यायाचा प्रचंड तिरस्कार होता.
#अकृतव्रण या शिष्याची कथा पाहिली तर आपणास ते लक्षात येईल
भगवान परशुरामांनी शिवशंकरांकडुन शस्त्रअस्त्र विद्या शिकली हे आपण सुरुवातीच्या भागांत पाहिले होते.तसेच श्री गणेशाकडुन त्यांनी परशुविद्या शिकली होती अग्निशिखे प्रमाणे तऴपणारा हा परशु गणपतीनेच त्यांना दिला होता. गणरायांकडुन शिक्षण घेवुन येताना एक अघटित घडले गर्द अरण्यात हिंस्र श्वापदांच्या डरकाऴ्या येत होत्या तेवढ्यात एका दीन वाणीने आक्रंदन करणार्या युवकाचा आवाज परशुरामांनी ऐकला त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला एका वाघाने एका युवकाला पकडले होते त्या बाणाने बरोबर वाघाचा वेध घेतला व तरुणाची सुटका झाली हा युवक म्हणजे परशुरामांचा शिष्य अकृतव्रण हा शांता ऋषिंचा पुत्र होता व पुढे परशुरामांचा अनन्य शिष्य झाला
पुढिल भागात महाभारतातले परशुरामांचे उल्लेख पाहुन या लेखमालेचा समारोप करु.
तुर्त लेखन मर्यादा

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com