सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान परशुरामांच्या चरीत्रातला अंतीम भाग पाहु.

मागील भागात श्री परशुरामांचे रामायण व महाभारतात आलेले उल्लेख पाहिले.श्री परशुरामांनी आपले कार्य पूर्ण केल्यावर महेंद्र पर्वतावर अध्यापनाचे कार्य सुरु केले द्रोण, भीष्म हे त्यांचेच शिष्य होते.भगवान परशुराम हे शस्त्रगुरु होते त्यांनी मोक्ष विद्येचा उपदेश भीष्म द्रोण अथवा कर्ण यांना केला नव्हता.
भीष्म व भगवान परशुरामांचे युध्द झाल्याचा व त्यात श्री पशुरामांचा पराभव झाल्याचा उल्लेख महाभारतात आहे. अंबा अंबिका व अंबालिका या काशी नरेशाच्या तीन कन्या यांचे स्वयंवर मंडपातुन भीष्मांनी विचित्रवीर्य या हस्तिनापुर सम्राटाकरता अपहरण केले.अंबे ने भीष्म व सत्यवतीला सांगीतले मी मनातुन शाल्व राजास वरले आहे व स्वयंवरात त्यालाच माला घालणार होते शाल्व हाच माझा पती मी मनाने वरला आहे.त्यामुऴे भीष्माने तीला शाल्वराजाकडे परत पाठवले परंतु अपहरण केलेल्या अंबेचा त्या शाल्वाने स्विकार केला नाही त्यामुऴे अंबा भीष्मांकडे परत आली व आपण माझा स्विकार करावा अशी विनंती केली .भीष्मांनी आपण ब्रह्मचर्यव्रताची प्रतिज्ञा केली असल्यामुऴे मी विवाह करु शकत नाही असे अंबेला सांगीतले त्यामुऴे अंबा न्याय मिऴवण्याकरता अनेक राजांकडे गेली परंतु भीष्मांचा पराक्रम माहित असल्याने सर्वांनीच असमर्थता दर्शवली.
अंबा मग भीष्मांचे गुरु श्री परशुरामांकडे गेली व त्यांना सर्व हकीगत कथन केली .श्री परशुराम मग भीष्मांजवऴ आले व अंबेशी विवाह कर अशी त्यांना आज्ञा केली परंतु आपण ब्रह्मचारी आहोत त्यामुऴे विवाह करणार नाही असे भीष्मांनी सांगीतले.मग परशुराम क्रोधीत झाले त्यांनी भीष्मांना युध्दाचे आव्हान दिले.
अनेक दिवस हे घनघोर युध्द चालले व भीष्मांनी महासंहारक अस्त्र अखेर बाहेर काढले.या अस्त्रामुऴे महाभयंकारी विनाश ओढावु शकतो हे नारदमुनी व गंगा मातेच्या लक्षात आले त्यांनी या दोघांची समजुत घातली व भगवान परशुरामांनी आपला पराभव मान्य केला व ते निघुन गेले (भगवंतांचा आवेश तेज व क्रोध हा रामांकडे सुपुर्द केला असल्याने भगवान परशुरामांचा पराभव झाला)
महाभारतातल्या हरीवंशात देखील कृष्ण व बलराम यांची श्री परशुरामांची भेट झाली असा उल्लेख आहे.
जरासंधाने अनेक वेऴा मथुरेवर स्वारी केली होती व कृष्णाचा पराभव केला होता. त्यामुऴे सतत च्या युध्दाने कृष्ण व बलराम हे दोघे द्वारकेतुन निघाले व विविध यात्रा करत असताना महेंद्र पर्वतावर आले तिथे त्यांना जटाधारी श्री परशुरामांचे दर्शन झाले.
त्यांनी भगवंतांना नमस्कार केला व सर्व वृत्तांत कथन केला तेव्हा श्री परशुरामांनी बलराम व कृष्णांना सांगीतले की जरासंधाचा वध हा तुमच्या हातुन होणे नाही त्यामुऴे तुम्हि राजधानी सुरक्षीत ठिकाणी हलवा त्यामुऴे भगवान श्रीकृष्णांनी समुद्रात सुरक्षित द्वारका नगरी वसवली शत्रु प्रबऴ असता योग्य काऴी माघार घेणे हे देखील योध्दाला जमले पाहिजे तेच भगवान परशुरामांनी श्रीकृष्णांना सुचवले होते.
महाभारतात भगवान परशुरामांचे हे उल्लेख आलेत.
त्या नंतर नवनाथांपैकी काही नाथ मंडऴींना भगवान परशुरामांनी विविध विद्या शिकवल्याचे उल्लेख विविध ग्रंथात आलेत. आजही महेंद्र पर्वतावर गुप्त रुपाने भगवान परशुराम वास्तव्यास आहेत.ब्रह्मेंद्रस्वामींना (पेशवे काऴात) त्यांनी दर्शन दिल्याचे उल्लेख आहेत.उत्तर भारतात अनेक ठिकाणी भगवान परशुरांची उपासना आजही श्रध्देने केली जाते. डॉ.सच्चिदानंद शेवडे गुरुजींनी केलेल्या आज्ञेनुसार हि लेखमाला लिहिली आहे.
रोहन दादा उपऴेकर व चितऴेसर यांचे याकामी मार्गदर्शन लाभले त्यामुऴे या सर्वांचे आभार मानुन हि लेखमाला पूर्ण करतो
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com