DevDharm —


लेखनमाला क्र.1 आपल्या वेद किंवा पुराण संस्कृतीत किती गूढता आणि सहजता आहे नाही का? म्हणजे बघा एक श्लोक पाठ करून आपण खूप काही लक्षात ठेवू शकतो अगदी सहज असाच एक श्लोक. आपण नेहमी ऐकतो 18 पुराणे आहेत. पण नक्की कोणती ती काही लक्षात नसतात. फार फार तर काही लोकांना 5 ते 6 नावे माहीत असतीलही तर ती लक्षात ठेवण्यासाठी एक सुंदर श्लोक.... 18 पुराण मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयं । अनापलिंगकूस्कानि पुराणानि पृथक् पृथक् ।। अर्थात् श्लोका मधे पहिल्या अर्धेली म्हणजे पहिल्या ओळीत सांगितलेली पुराणे पुढीलप्रमाणे 1) मद्वयम् म्हणजे म वरून सुरू होणारी 2 पुराणे मत्स्यपुराण, मार्कंडेय पुराण 2) भद्वयम्- भविष्य पुराण, श्रीमत् भागवत पुराण 3) ब्रत्रयम्- ब्रह्म, ब्रह्माण्ड, ब्रह्म वैवर्त पुराण 4) वचतुष्टयं- वामन, विष्णु, वायु, वाराह पुराण वरील 11 पुराणे अधिक दुसऱ्या अर्धेली (ओळीतील) पुराणे श्लोकाचा प्रत्येक अक्षारागणिक एक पुराण अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कंद याप्रमाणे 18 पुराणे आहेत. संदर्भ श्रीमद्भागवत महापुराण. आहे की नाही सुंदर....... श्लोक पाठ करा आणि लक्षात ठेवा. @ वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी. ९८९२३०८३८३