DevDharm —


लेखनमाला क्र 2 नमस्कार. सर्व विद्वत जनांना नमस्कार करून आणि ज्यांच्या सद्वर्तना ने धर्म जगतो, टिकतो अशा धार्मिक सज्जनांना अभिवादन करून माझा अल्पशा मातीने आपल्या पुराणांबद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. काल 18पुरणां बद्दल एक श्लोक व त्याचा अर्थ फेसबुक च्या माध्यमातून प्रसारीत केला होता त्यात कमेंट म्हणून एका गुरुजी वजा मित्र वे. बाळासाहेब खरे जोशी. खार. यांनी पुरणाची व्याख्या किंवा लक्षण सांगणारा एक श्लोक प्रस्तृत केला होता. आज तोच श्लोक व ती लक्षणे नक्की कोणती ती आपण पाहू. मूळ श्लोक: सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणिच । वंशानुचरितं चैव पुराणं पञ्चलक्षणम् ।। पंच लक्षण- सर्ग, प्रतिसर्ग, वंश , मन्वंतर वर्णन, वंशानुचरित अशी पाच लक्षण प्रत्येक पुराणात आहेत. 1) सर्ग- सात्विक, राजसी, तामसी स्वरूप असणारी अनुक्रमे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली नामक शक्तीचा सृष्टी करिता शरीर धारण करणे म्हणजे सर्ग. 2) प्रतिसर्ग- सृष्टीच्या सृजन, पालन आणि संहारासाठी अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु, महेश यांची उत्पत्ती म्हणजे प्रतिसर्ग. 3) वंश - चंद्रवंशी, सूर्यवंशी राजांचे वंश वर्णन उदा. प्रभू श्रीराम, गोपालकृष्ण यांचे वंश,तसेच वेगवेगळ्या दैत्यांचे वर्णन उदा. हिरण्यकश्यपू , हिरण्याक्ष, रावण ई. यालाच वंश म्हणतात. 4) मन्वंतर- स्वायंभुव आदी चौदा मनुं चे वर्णन तसेच त्यांची कालगणना , विभाग म्हणजेच मन्वंतर 5) वंशानुचरित- वरील 14 मनुंचे क्रमाने वंश वर्णन म्हणजेच वंशानुचरित. अशा 5 लक्षणांनी युक्त असते त्या ग्रंथाला पुराण असे म्हणतात. उगाच काहीही अर्बट चर्बट मोठे पुस्तक लिहिले आणि त्याला पुराण किंवा ग्रंथ असे म्हंटले असे नाहीये. हल्ली असे बरेच नवीन लेखक तयार झाले आहेत की मूळ इतिहास माहीत नसताना काहीही काल्पनिक लिहून प्रस्तृत करतात आणि त्याला कोणताही पाठपुरावा नसताना तोच मूळ ग्रंथ आहे असे भासवतात त्यापुढे जाऊन त्यावर विविध चॅनल वर मालिका किंवा चित्रपट तयार करतात आणि ज्यांना मूळ कथा माहीत नाही अशा बहुतांश पाहणाऱ्यांना ही तेच खर आहे असे भासते. ©️वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी. 9892308383