लेखनमाला क्र 3 नमस्कार, सर्व विद्वत जनांना नमस्कार करून आणि ज्यांच्या सद्वर्तना ने धर्म जगतो, टिकतो अशा धार्मिक सज्जनांना आणि वैदिक मंडळींना अभिवादन करून माझा अल्पशा मातीने आपल्या पुराणांबद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. काल आपण 18 पुराणे कोणती ती पाहिली परंतु ही सर्व पुराणे व्यासांनी लिहिली हे पण सर्वांना माहिती असेलच. पण एकूण 28 व्यास झाले. आता तुम्ही म्हणाल की व्यास झाले म्हणजे काय? तर व्यास ही पदवी आहे किंवा व्यास हे एक स्थान आहे .म्हणजे जसे आत्ताचे कॉलेज चे प्रिन्सिपॉल असतात तसेच. एकूण 28 महायुगांपैकी प्रत्येक द्वापार युगात एक व्यास झाले आणि प्रत्येकाने वेगवेगळे कार्य केले. आता कोणकोणते व्यास झाले ते आपण बघू. सर्वप्रथम स्वतः ब्रह्मदेव व्यास झाले आणि त्यांनी वेदांचे विभाजन केले. याप्रमाणे अनुक्रमे प्रजापती, शुक्राचार्य, बृहस्पति, सूर्य, यमराज, इंद्र, वसिष्ठमुनी, सारस्वत, त्रिधामाजी, त्रिवृष, भारद्वाजमुनी, अंतरिक्ष, धर्मराज, त्रय्यारूणि, धनंजय, मेधातिथि, व्रतीमुनि, अत्रि, गौतम, हर्यात्मा उत्तम, वाजश्रवा वेन, आमुष्यायण सोम, तृणविंदु, भार्गव, शक्ति, जातुकर्ण्य आणि ज्यांनी ही सर्व पुराणे आणि उपपुराणे रचली ते कृष्णद्वैपायन महाव्यास मुनी. असे हे 27 व्यास मुनी होऊन गेले. आणि अठ्ठावीसावे महव्यास म्हणजेच कृष्ण द्वैपायन हे चिरंजीव झाले. व्यासांनी ही सर्व पुराणे आपला विद्वान, महात्मा, विरक्त असा पुत्र शुक देवजी यांना सांगितली . आणि जेव्हा ही पुराणे शुक देवांना व्यास महर्षी सांगत होते तेव्हा तेथे अजूनही अनेक ऋषी किंवा श्रोते ही होते. त्यातच एक असा श्रोता होता की की जो एकपाठी होता. त्यांचे नाव सुत महर्षी. खूप एकचित्ताने श्रवण आणि मनन केल्याने त्यांचे नाव उग्रश्रवा असेही पडले.. आपण खूप व्रत, पूजा करतो त्यात बऱ्याच ठिकाणी सुत म्हणाले असे जे आहे ते सुत म्हणजेच हे सुत महर्षी. तसेच मुद्दाम एक मुद्दा इथे मंडावसा वाटतो तो म्हणजे हे सर्व सामान्य श्रोते ब्राह्मण नव्हते. पूर्वांपार जी काही गोष्ट सर्व लोकांवर बिंबवली जातेय की ज्ञान फक्त ब्राह्मणांकडे च होते किंवा त्यांनी इतर लोकांना शिकवले नाही तर त्या त्यांच्या मताला हा भेद आहे. म्हणजेच त्या काळीही सर्व सामान्य कोणालाही हे ज्ञान सहज प्राप्त करता येत होते फक्त गुरुगृही राहून त्यांचे सर्व आचार, विचार, नियमांचे पालन करूनच. जे आत्ता कुणालाही करावेसे वाटतच नाही. असो. तर असे हे सूत मुनि. आणि नंतर याच सूत महर्षींनी नैमिष अरण्यात 28 हजार ऋषिंना ही पुराणे समजावून सांगितली. त्यानंतर ही सर्व पुराणे सर्वत्र प्रसृत झाली. ©️वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी. 9892308383