लेखनमाला क्र.4 दि.21एप्रिल 2020. नमस्कार,. सर्व विद्वत् जनांना नमस्कार करून आणि ज्यांच्या सद्वर्तना ने धर्म जगतो, टिकतो अशा धार्मिक सज्जनांना आणि वैदिक मंडळींना अभिवादन करून माझा अल्पशा मतीने आपल्या वेद आणि पुराणांबद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. या अगोदर 3 लेख लिहिले पण त्यावर लेखनमाला क्रमांक लिहिले नव्हते कारण सहज असे लेख लिहिले जातील असे मलाही वाटले नव्हते. या लॉक डाऊन च्या काळात वेळ असल्याने लिहिण्याचा अल्पशा मतीने लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न केला पण चांगला प्रतिसाद मिळाला आणि वैयक्तिक ओळखणाऱ्या मित्र, गुरुजी यांनी अजूनही शक्य असेल लेख लिहिण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले म्हणून पुढे काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. जाणकार मार्गदर्शक यांनी काही चूक असल्यास निदर्शनास जरूर आणून द्यावी म्हणजे प्रयत्न पूर्वक सुधारणा करता येईल. असो. अगोदरच्या लेखन मालेत आपण किती आणि कोणती पुराणे आहेत तसेच कशी प्रस्तृत झाली ते पहिले. तर आज आपण कोणत्या पुराणात किती श्लोक , कोणत्या वेदात किती मंत्र आहेत ते पाहू. आता हे काय गरज किंवा काय आवश्यकता याची असे कोणी म्हणेल तर त्याचे कारणही तसेच आहे. आतापर्यंत अनेक विद्वानांनी, लेखकांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी अनेक पुस्तके , कथा- कादंबऱ्या ई. लिहिले आहे. पण प्रत्येक नवीन आवृत्तीत नवीन काहीतरी लिहून, काही भाग कमी करून असे प्रसिद्ध करतात. अगदी न्यायव्यवस्थेची कलमे सुद्धा बदलतात. भारतीय संविधान मध्ये सुद्धा प्रसंगानुरूप राज्य सभा, लोकसभा सर्वानुमते कलम बदल करतात. परंतु आपली सनातन वेद , पुराणे अशी आहेत की त्यात अगदी अनादी काळापासून आत्तापर्यंत काहीही बदल केला नाही. एवढंच नाही तर प्रत्येक वेदात मंडल, अष्टक, सूक्त, मंत्र, पद (शब्द), अक्षर, छंद याचा ही उल्लेख आहे. जो आत्ता पर्यंत बदललेला नाही बदलुच शकत नाही. पण इतर सर्व पुस्तके , कथा यात त्यांनी किती काय लिहिले आहे हे लिहिणाऱ्यालाही माहीत नसते. आत्तापर्यंत सर्वात जास्त प्रचलित असे मानले गेलेले भारतीय संविधान जे महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 129 विद्वानांनी लिहिले यात किती वाक्य, शब्द, अक्षरे आहेत याचा कोणी अभ्यास किंवा विचार केला तरी असेल का? फार फार तर यातील कलमे किती आणि त्याचा वापर एवढंच माहिती असेल पण आपल्या वेद पुराणामध्ये प्रत्येकामध्ये श्लोक मंत्र ई. अचूक माहिती सर्व सविस्तर उल्लेख आहे. आधी आपण वेदांची संख्या पाहू. ऋग्वेद - मंडल संख्या 10, सूक्त संख्या 1028, मंत्र संख्या 10552, पद संख्या 1,53,826 ,अक्षर संख्या 3,97,265, छंद संख्या 20. हे फक्त संहितेचे झाले याशिवयही अन्य वेंदाचे उपग्रंथ आणि आणि वेदांग आहेत... ब्राह्मण, आरण्यक, उपनिषदे, शिक्षा, ज्योतिष, छंद, कल्प, निरुक्त, व्याकरण... असे हे दहा ग्रंथ. हे सर्व ग्रंथ पाठ असणाऱ्या ला दशग्रंथी म्हणतात... पुन्हा हे मंत्र म्हणण्याची 8 विकृती आहेत. ते म्हणाऱ्याला घनापाठी म्हणतात. असो.... लेखन मर्यादा सांभाळून विकृतेचे प्रकार, म्हणायचे नियम आदी लिहीत नाही... तर असेच सर्व च वेदांबद्दल वेगवेगळे आहे. तसेच प्रत्येक वेदाला उपवेद आहे. पुढे फक्त बाकी 3 वेदांच्या संख्या पाहू. यजुर्वेद 1) शुक्ल यजुर्वेद 2) कृष्ण यजुर्वेद- संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद मिळून 18000 , अध्याय -44, अनुवाक 651, सामवेद -मंत्र संख्या1875 अथर्ववेद-6000 मंत्र आता पुराणांच्या संख्या पाहू. ब्रह्म पुराण 10 हजार श्लोक, पद्म पुराण 55 हजार, विष्णु पुराण 23 हजार, शिवपुराण 24 हजार, श्रीमत् भागवत पुराण 18 हजार, नारद पुराण 25 हजार, मार्कंडेय पुराण 9 हजार, अग्नि पुराण 15,400, भविष्य पुराण 14,500, ब्रह्मवैवर्त पुराण 18 हजार, लिंग पुराण 11 हजार, वराह पुराण 24 हजार, स्कंद पुराण 81 हजार 100, वामन पुराण 10 हजार, कूर्म पुराण 17 हजार, मत्स्य पुराण 14 हजार, गरुड पुराण 19 हजार, ब्रह्मांड पुराण 12 हजार अशी एकूण श्लोक संख्या 4 लाख एवढी आहे. तर असे आहे आपल्या वेद आणि पुराणांचे मापन. जे कोणत्याही प्रदेशात, परिस्थितीत अजिबात काना, मात्र, वेलांटी अगदी बिंदू मात्र फरकानेही बदलत नाही. एवढी एक सुत्रता, सूत्र बद्धता वेद आणि पुराणामध्ये आहे जी इतर कोणत्याही ग्रंथ , पुस्तका बाबत तुम्हाला कुठेही आढळणार नाही. याशिवाय ही अनेक उपपुराणे, संत साहित्य आहेतच. असो. तूर्तास इथेच विषय संपवतो. संदर्भ... श्रीमद् भागवत, देवी भागवत. चतुर्वेदी संहिता. यात लिहिण्यात काही चूक असेल तर ती माझीच आहे परंतु वेद पुराणात कोठेही तसू भरही चूक नाही. ©️वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी. 9892308383