लेखमाला क्र.5 दि.22 एप्रिल 2020 नमस्कार,. सर्व विद्वत् जनांना नमस्कार करून आणि ज्यांच्या सद्वर्तना ने धर्म जगतो, टिकतो अशा धार्मिक सज्जनांना आणि वैदिक मंडळींना अभिवादन करून माझा अल्पशा मातीने आपल्या शास्त्रांबद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. सध्या प्रचलित कोरोना विषाणू पासून होणारा जो काही प्रसार आहे तो स्पर्श, उघड्यावर थुंकणे, तोंडावर वस्त्र न धरता शिंकणे, खोकणे ई पासून होतोय. अर्थात सर्वच संसर्गजन्य रोग या प्रकारच्या काही तरी कारणांमुळे प्रसरतो. आणि हे न होऊ देण्यासाठीच सरकार, डॉक्टर वेगवेगळे सल्ले देत आहेतच. हे सल्ले म्हणजेच पूर्वीच्याच काळात याला सोवळे म्हणजे स्ववलय म्हणायचे. आपल्या सभोवताली असणारे आपल्या आचार विचार यांचे आभा मंडल यांच्या कक्षेत कोणालाही येऊ न देणे म्हणजेच हे सोवळे. म्हणजेच आत्ता जे सोशल डीस्टस्न सरकार म्हणतय तेच ते. आता मी हे का बोलतोय असा प्रश्न पडलाच असेल..... तर हेच आपल्या ग्रंथांमध्ये दिले आहे, की या संसर्ग जन्य रोगापासून वाचण्यासाठी काय उपाय करावे. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ आपण पाहू. हा मूळ श्लोक स्मृती ग्रंथामध्ये आहे. वैवस्वत प्रजापती मनु यांच्या मूळ ग्रंथातील आहे. उपानहौ च वासश्च धृतमन्यैर्न धारयेत्। उपवीतमलंकारं स्रजं करकमेव च ।। अर्थात् पादत्राणे, कपडे, जानवे, हार, टोपी, अगदी तांब्या भांडी ई दुसऱ्याने वापरलेले कोणतेही वस्तू आपण वापरू नये. अशा वस्तू पासूनच संसर्ग होण्याचा खूप मोठा धोका असतो. अगदी आयुर्वेदाने सुद्धा या वस्तू दुसऱ्याच्या वापरण्याचा निषेध केला आहे. तसेच याच प्रकारच्या संसर्ग न होण्यासाठीचा अजुन एक श्लोक पाहू.. अनातुरः स्वानि खानि न संस्पृशेदनिमित्ततः । रोमाणि च रहःस्थानि सर्वाण्येव विवर्जयेत् ।। अर्थात् निरोगी माणसाने विनाकारण नाक, कान, डोळे, केस, दाढी ई अवयवांना विनाकारण वारंवार स्पर्श करू नये. हे सर्व नियम शास्त्र या रूपात आपल्या ऋषींनी , मुनींनी सर्वांना सांगितले... याचे कारण हे रोग निवारण किंवा रोगांपासून सामान्य लोकांना दूर ठेवणे हेच आहे. म्हणजे बघा आपल्या पूर्वजांना, ऋषींना नक्की माहिती होते की नक्की संसर्ग कशा-कशामुळे होऊ शकतो.... आणि त्याच साठी त्यांनी हे सर्व अगोदरच लिहून ठेवले होते. ©️वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी. 9892308383