फाल्गुन कृ.६ मंगळवार
२६ मार्च २०१९
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
काल आपण जमदग्नींची जन्मकथा अभ्यासली होती सत्यवतीचा पुत्र हा जमदग्नी झाले व मातेच्या पोटि विश्वामित्र जन्मले हे जन्माने क्षत्रिय होते परंतु त्यांचा जन्म ज्या चरुच्या मंत्रसामर्थ्यामुळे झाला होता तो ब्राह्मतेज युक्त होता त्यामुळेच त्यांच्यामध्ये जन्मत: ब्रह्मतेज जागृत झाले व त्यांनी प्रचंड उपासना करुन श्रेष्ठपद प्राप्त केले
जमदग्नींनी रेणू ऋषींची कन्या रेणुकेचे पाणिग्रहण केले.नर्मदेच्या तीरावर जमदग्नींचा आश्रम होता #एकोणिसाव्या_त्रेतायुगात परशुरामांचा जन्म झाला.महाभारत मते त्रेता व द्वापार या युगांच्या संधिकाऴात भगवान श्री परशुरामांचा जन्म झाला .वैशाख शु.तृतीया (अक्षय्य तृतीया) हि भगवान श्री परशुरामांची जन्मतिथी. भगवान परशुराम हे भावंडामध्ये सर्वात धाकटे होते.वसुमान (वसू) सुषेण, रुमण्वत, विश्वावसू असे चार जेष्ठ बंधु भगवान श्री परशुरामांना होते. भगवंत लहानपणापासुनच प्रचंड तल्लख होते उपनयनानंतर त्यांनी शालग्राम पर्वतावर निवास करणार्या काश्यपांकडुन सर्व विद्यांचे अध्ययन केले. भगवंतांच्या किंवा संतांच्या सर्व अवतारांचे हेच वैशिष्ट्य आहे कि गुरुंचे हि गुरु असुन त्या सर्वांनी गुरुंची सेवा करुनच विद्या ग्रहण केली हा यातला महत्वाचा भाग आहे.श्रीरामांनी वसिष्ठ व विश्वामित्रांकडे, श्रीकृष्णांनी सांदिपनींकडे गुरुकुलात राहुन गुरुसेवाकरुनच विद्या ग्रहण केली.
समाजासमोर आदर्श उभा राहण्याकरता व गुरुसेवनाचे महत्व समाजास कऴण्याकरता अंगी नम्रता येण्याकरता गुरुगृहि सेवाकरुन शिक्षण घेणे आवश्यक आहे.
पैसे फेकुन शिक्षण घेण्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीमुऴे नम्रपणा व गुरु व समाजाविषयीची कऴवऴ कमी होताना दिसतेय. गुरुकुलात राजाश्रयावर व समाजाश्रयावर मोफत शिक्षण घेता येत असे त्यामुऴे विद्यार्थ्याला नेहमी समाजऋणाचे भान असे त्यामुऴे आपल्या विद्येचा विनियोग तो समाजाकरता करत असे. गुरुकुलात गरीब व श्रीमंत असे दोन्हि प्रकारचे विद्यार्थी राहत असत व शिक्षण घेत असत त्यामुऴे आर्थिक दरीमुऴे येणारी वैचारीक विषमता त्यांच्यात येत नसे. सुदामा हा गरीब ब्राह्मण व श्रीकृष्ण हे राजे हे परममित्र याच गुरुकुल व्यवस्थेमुऴे होते.२१ शतक हे बुध्दिमंतांचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे म्हणुन जो गाजावाजा केला जातो त्यात हि आर्थिक दरी मिटवण्याकरता मात्र कोणतेहि शिक्षण सम्राट अशी मोफत गुरुकुल योजना राबवत नाहि हे समाज प्रगतीचे लक्षण जाणावे कि अधोगतीचे? हेच कळत नाहि
भगवान परशुरामांनी वेद व शस्त्र विद्या काश्यपांकडुन आत्मसात केली.धनुर्विद्येवर त्यांचे विशेष प्रेम होते.काश्यपांकडुन अध्ययन पूर्ण करुन भगवंतानी पुढिल शिक्षण कोठे व कसे प्राप्त केले या करता कोणती उपासना केली या बद्दल उद्या पाहु.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले