संस्कृती सभ्यता संस्कार या गोष्टी स्थलकालानुसार काही प्रमाणात तरी बदलत असतात. बदल हा सृष्टीचा स्थाई भाव आहे.
अनेक ऋषि, मुनी, तज्ञ, विचारवंत, समाजसुधारक, वैज्ञानिक यांनी वेळोवेळी केलेल्या संशोधन, विचारमंथन, प्रबोधन व सुधारणांचा प्रदिर्घ इतिहास आपल्या भारत देशास लाभला आहे....आणि हा वारसा शेकडो हजारो वर्षांच्या अनेक वैचारिक भौतिक परिस्थितीच्या द्वंद्वातून तावून सुलाखून निघालेला आहे...तरीही आज मार्गदर्शक आहे....यामुळे मनःशांती, मानसिक स्वास्थ्य व सुदृढता निश्चितच प्राप्त होते.
निश्चल मानसिकता, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, प्रदीर्घ ऐतिहासिक वारशामुळे प्राप्त झालेली शुद्ध विद्वत्ता यांच्या बळावर कोणत्याही व्यक्ती व पर्यायाने राष्ट्राचा विकास जलद तसेच दैदिप्यमान पद्धतीने होणारच हे नक्कीच.



. धर्म, पंथ, जात, पोटजात या संकल्पनांचा आधार घेऊन त्यात कालपरत्वे रूढ होत गेलेल्या चुकीच्या परंपरांना उचलून धरत समाजात आज कमालीची दरी निर्माण करण्यात आली असली तरी आपल्या देशाचा...राष्ट्राचा.. विचार करता आपली भारतीय संस्कृती ही या सर्व मतभेदांहून अधिक श्रेष्ठ व मोलाची आहे हे विसरून चालणार नाही.
आपले राष्ट्र पारतंत्र्यात ... मानसिक दृष्टीने... जाण्यापूर्वीच्या काळात जे संस्कार आपल्या कुटुंब संस्थेत पुढील पिढीवर होत होते...(....ज्या बळावर आपले राष्ट्र लुटून नेण्याची परकियांना लालसा निर्माण व्हावी इतके समृद्ध होते.…..)....जे आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाचा मूलभूत आधार होते.... ते संस्कार आज पुढील पिढीवर होत नाहीत....
एकत्र कुटुंब व्यवस्था नाही. जीवन पद्धती बदलली आहे. ताणतणाव अतिशय वाढले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून मानसिक स्वास्थ्य पर्यायाने राष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. आणि अशाने विघातक वृत्ती व कृतींचे प्रमाण वाढत आहे.
अशा परस्थितीमध्ये आपण आपला सांस्कृतिक वारसा, नैतिक मूल्य यांच्या साहाय्याने आपला सर्वांगीण विकास कण्यासाठी धडपड करणे हे अधिक शहाणपणाचे ठरेल.....



. म्हणूनच *देव धर्म* या दोन शब्दांच्याही पलीकडे जाऊन या संकेतस्थळावर आपल्याला अजून एका शब्दावर, संकल्पनेवर, किंवा विषयावर बरेच साहित्य, लेख उपलब्ध करून देण्याचा मानस आहे...
समाजास उत्तम दिशा देणार आणखी एक दुवा जो सर्वसामान्यांमध्ये असायला हवा...ज्याच्या प्रेरणेने नितीमुल्यांची जपणूक करण्यास व मानवतावादी दृष्टिकोन वाढवण्यास आपण उद्युक्त होतो...तो म्हणजे.. *देशप्रेम* !!
उत्तम संस्कार, नीतिमत्ता, हे काही फक्त देव धर्म जातपात या संकल्पनांना चिकटलेले विषय नाहीत....अनेकविध श्रद्धास्थाने व्यक्तीसापेक्ष असू शकतात ..
...... मात्र समाज राष्ट्र सृष्टी यांचा विचार करून सर्वांना उत्कर्षाप्रत नेणारे मार्गच विधायक असणार...



याच विचारातून अनेक सूज्ञ, अभ्यासू, ज्ञानी, धर्म संस्कृती देश याविषयी प्रेम व आस्था असणारे असे गुरु मित्र व अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यांचे अनेक लेख , संकलने, व इतर साहित्य आपणास इथे एकत्रित मिळेल असे प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करीत आहोत ...आणि या कार्यात अनेकांचे सहकार्य लाभत आहे हे आल्हाददायी आहे !!

।।