दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी फिरायला जायचं ठरलं नेहमी चा प्रश्न कुठे जायचे? आमच्या बजेट मध्ये कुठलं बसेल या आधी बरेच प्रवास केले माझं प्राधान्य ट्रेन लाच जर मी जातो त्या ठिकाणी ट्रेन असेल तर दुसऱ्या पर्याय चा मी विचारच नाही करत या वेळी मात्र एकतरी प्रवास विमानाने करावा म्हणून बराच काथ्याकूट केल्यावर शेवटी बजेट वाढवून केरळ ट्रिप ठरली
4 महिने आधी आरक्षण मिळविणे हे एक दिव्यच असते. आता आरक्षण मिळविण्याची कसरत करायची होती. माझे पहिले प्राधान्य स्लीपर किंवा 3टायर श्रेणीला असते. पण नेहमीच्या सुपरफास्ट गाड्या फूल होत्या. निझामुद्दीन एर्नाकुलम वातानुकुलित दुरंतोचा पर्याय निवडला. त्यातही एसी-३ ला वेटींग सुरू झाले होते. पण त्यावेळी या गाडीला स्लीपर श्रेणी होती. पाच डबे होते. त्यात २००च्या जवळपास जागा शिल्लक होत्या. म्हणून नाईलाजाने (आणि पैसे वाचावेत)त्या श्रेणीचे तिकीट आरक्षित केले. कारण नेहमीच्या एसी-३ पेक्षा यात १४ बर्थ जास्त असल्याने अडचणच असेल अशी माझी समजूत होती. ती खरी ठरली. आम्हाला s5मध्ये 49ते 58 क्रमांकाचे बर्थ मिळाले. बर्थ क्रमांकाच्या पुढे एसएल लिहिल्यामुळे भलताच खूष झालो होतो. कारण साईड लोअर बर्थ होता तो. पुढे प्रत्यक्ष गाडीत चढेपर्यंत मी सारखा हिशोब करत होतो की, 55क्रमांक साईड लोअर कसा काय. अखेर प्रवासाला निघण्याचा दिवस आला. गाडी वसई तुन होती मी विरार वरून पूजा स्वरा संतोष येणार अस ठरलं बाकीचे (कुणाल अमेय केदार महेश मंदार मधुरा )वसई ला परस्पर बसणार होते (पण काही कारणास्तव मंदार मयुरा च वसई तुन बसणं कॅन्सल झालं ते मडगाव ला रात्री बसणार होते)तेवढ्यात 2;30वा महेश विरार ला घरी आला म्हणाला लवकर आलो म स्टेशन ला बसण्यापेक्षा इथे जाऊ म्हणून आलो म्हटलो हरकत नाही तसा महेश माझा जुना दोस्त आम्ही पहिल्यांदा वैष्णवदेवी यात्रा केली नंतर एक एक आले काही आजही येतात, काही परत नाही आले 2-3ट्रिप महेश ही आजरपणाने येऊ नाही शकला पण तो यावेळी येतोय म्हणून आनंद झाला ट्रिप चा अलिखित नियम(,कोणी केला काय माहीत) जून -जुलै आणि जानेवारी ला कुठेतरी जायचंच म जे येतील त्यांना घेऊन जे नाही येणार त्यांचा शिवाय जे विरोध करतील त्यांचा विरोध मोडून जायचं आमची गाडी 4:20pm त्यामुळे 3:50लोकल पकडायची ठरली संतोष सर्वांची लोकल तिकीट काढून स्टेशल ला भेटणार होता स्टेशनमध्ये यायला निघालो पण रिक्षा मिळायला तयार नाही लहान मुलगी समान म्हणून शेवटचा पर्याय म्हणून माझी स्कुटर काढली पहिली फेरी महेश ला स्टेशन ला सोडलं दुसऱ्या फेरी त स्वरा आणि बायको ला 3ऱ्या फेरीला सोसायटी मधल्या मित्राला घेऊन आलो त्याने मला सोडून गाडी घेऊन तो घरी गेला संतोष वगरे उभेच होते पण त्या गडबडीत तेवढयात 3:50चुकली नंतर थेट4:08 चर्चगेट मनातून घाबरलो कट टू कट पोचणार होतो मनात म्हणालो गाडी चुकली तर शेवटी इलाज नव्हता 4:08पकडली सहज म्हणून live stetus चेक केलं तर चक्क लेट होती 5मिनिट सुटकेचा निःश्वास सोडला कुणाल चा फोन आला तो म्हणाला आम्ही पोचलो 5नंबर ला गाडी लागत आहे म्हणालो केदार कुठे? पण तो कुठेच वेळेत जात नसल्याने कोणी सिरियसली नाही घेतलं जेव्हा वसई ला पोचलो तेव्हा गाडी लागतच होती. आणि तेवढ्यात बघतो तर चक्क केदार हजर म्हटलं चा पात्रांची सिद्धता झाली होती आता निघायचं , राजधानी दर्जाच्या गाडीतून, माझ्या कोंकण मार्गावरून आणि इतकेच नव्हे तर आपण सूचविलेल्या धावणाऱ्या गाडीतून माझा पहिलाच प्रवास होता. म्हणूनच खूप एक्साईटमेंट होती.
4;30pm वाजता आमची 12284 (तेव्हाचा क्रमांक) दुरंतो एक्सप्रेस सुटली. वसई वरून मडगाव पर्यंत इंजिन डब्ल्यूसीएएम-२पी कडे होते. माझा डबा शेवटून 7वा होता. माझ्या बाजूच्या अन्य बर्थवर केरळ च्या व्यक्ती होत्या. त्यांची (आणि आमची रात्रीपर्यंत अखंड बडबड चालू होती. अर्थातच ती कोणालाच समजत नव्हती. गाडी हळुहळू वेग पकडत होती आणि सर्व प्रवाशांना प्रथम कचोरी दिली त्याने सात च दिल्या मी 9मागितल्या तेवढ्यात तिकीटचेकर आला तिकीट पिशवी सापडेना अखेर प्रयत्नार्थी सापडली तो म्हणाला मयुरा चा id दाखव म्हणालो गोव्यात चढणार आहेत तो म्हणाला अस नाही चालत शेवटी tc आणि अटेंडंट शी भरपूर वाद झाला शेवटी 7च कचोऱ्या मिळाल्या भंकस चहा मिळाला 7पाण्या च्या बाटली दिल्या एक कंटेनरची मालगाडी गेली. कोपर नंतर एक मोठे रिंगण पार करत गाडी पुन्हा दिवा पनवेल बाजूला आली. तेथे पूल ओलांडून दातीवली क्रॉस केले. थोड्याच वेळात पनवेलहून आलेली बीटीपीएन (टँकर) मालगाडी धडधडत वसई कडे निघून गेली. थोड्याच वेळात तेथे दोन मालगाड्या डिटेन केलेल्या दिसल्या. कामण रोडलाही एक बीएलसी (कंटेनर) गाडी वसई दिशेने क्रॉस झाली. मुंबई, जेएनपीटी बंदरांना उत्तर भारताशी जोडणारा हा मार्ग असल्यामुळे आता मालगाड्यांची वर्दळ वाढली होती.
संध्याकाळी 5;55 ला आमची दुरंतो पनवेल जंक्शनवर दाखल झाली आणि इथून पुढे माझा सर्वांत आवडता मार्ग सुरू होणार होता. वसई रोडला चालक आणि गार्ड बदलले गेले. ही गाडी राजधानी दर्जाची असल्यामुळे तिचे चालक आणि गार्ड उच्च प्रशिक्षित आणि मोठा अनुभवी असलेले असतात. इथून पुढे विभागही बदलत असल्याने पुन्हा कॉशन ऑर्डर घेणेही आवश्यक असते. मडगाव दिल्ली राजधानी शेजारच्या मार्गावरून पुढे गेली. त्यानंतर दहा मिनिटांनी - 6:20 ला आमची दुरंतो सुटली आणि दुरोंतो चा गृप बीचा मार्ग असल्याने आमच्या गाडीनेही आता चांगलाच वेग धरायला सुरुवात केली होती. ती आता ताशी 70 कि.मी.च्या वेगाने धावू लागली होती. कोंकण मार्गावर इतका वेग नसतो. पुढे शेजारील अप मार्गावरून अनेक माल गाड्या वसई रोड कल्याण दिशेने जात होत्याच. साधारण तासाभराने नागोठणे ला पॅसेंजर ट्रेन क्रॉस झालीे. ल 7;40ला रोहा ओलांडले, त्यावेळी खेड लाएका फलाटावर तेजस एक्सप्रेस निघायची तयारी करत होती. साडेनऊ ला जेवण आले जेवण फालतुच पण भाजी बरी होती त्यात मी घरून पोळ्या आणलेल्या अमेय च्या आईने आंब्याचा मुरंबा पाठवला मस्तच होता त्यामुळं रात्रीचा जेवणाचा प्रश्न सुटला मध्ये टिसी दिसला मला वाटलं दुसरा असेल म्हणून त्याला सांगितलं आमच्या 2सीट मडगाव ला बसणार नाहीतर कॅन्सल करायचे बघितल तर मगाशी वाद घातला तोच होता परत वाद झाला तो म्हणाला मी तिकीट कॅन्सल केली मग वाद घातला फायनली तो म्हणाला अर्ज लिहून द्या मग ते प्रकरण निस्तरून मंदार ला फोन केला तो मडगाव जवळ पोचलो म्हणाला दुरंतो वेगात पळत असताना या सर्वांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच होती. 10;23ला कुठलातरी स्थानक वेगाने ओलांडल्यावर लगेचच विरुध्द दिशेने बीओएक्सएन (कोळशाच्या वाहतुकीचे) वाघिणींची मालगाडी पनवेलकडे गेली. पाठोपाठ आणखी एक मालगाडी (कंटेनर) गेली.
गाडीचा वेग किंचित कमी झाला. कारण रत्नागिरी आले होते. तिथे गाडी10मिनिट आधीच पोचलेली येथे उतरलो चहा स्वरा ला बिस्कीट वेफर्स घेतले गाडी 11;15पर्यंत थांबते पण गाडी 11वाजताच सोडली गडबडीत चढलो मंदार त्याचवेळी कंटेनरची मालगाडी विरुध्द दिशेने रत्नागिरी ओलांडत होती. तसर्व आडवे पडले सीट वर केव्हातरी 2:40 ला गडबड ऐकू आली बघतो तर मंदार मयुरा गोव्यात चढले होते चला सर्व आले तर दुरंतोच्या प्रवासातील हा पहिला सर्वांत मोठा थांबा आहे. अलीकडेपर्यंत येथे या गाडीचे इंजिन बदलले जात असे,-येथे चालक आणि गार्डही बदलले जातात आणि पुन्हा नव्याने कॉशन ऑर्डर दिल्या जातात. दुरंतो 3:05ला गोव्यातून निघाली. थोड्याच वेळात रात्रीच् बाहेरचे फारसे दिसत नव्हते.

पुढे मजल-दरमजल करत वाटेत येणाऱ्या काही रेल्वेगाड्यांना ओलांडत आमची दुरंतो ठीक 7;50वाजता मंगलोर ला पोचली पोहचली. वेळेच्या आधीच दहा मिनिटे आल्याने ती पुढे अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली. येथे पुन्हा चालक आणि गार्ड बदलले गेले. आमची दुरंतो प्लॅटफॉर्म क्र.3 वर उभी होती, मग नाष्टा आला ब्रेड कटलेट मग चहा तर तो चहा खास नव्हता . त्यामुळे पुन्हा चहा घेण्याशिवाय पर्याय नव्हता . मग आम्ही आणलेले पदार्थ काढले 12;35ला कोझिकोड आलं एक फोटो काढला चहा घेतला मधुरा चा उपवास पुजा ट्रेन मध्ये नाही खात त्यांना चहा दिला मग जेवण आलं बर होत प्रवास बराच झाल्याने कंटाळा यायला लागला मग एकदाचे एर्नाकुलम town ला आलो आणि right time चाललेली गाडी 2km साठी तिथे पाऊण तास थांबवून त्यांनी रेल्वे लेट आहे हे सिद्ध केलं एकूण प्रवासच एक्साईटिंग होता. एकदाचे एर्नाकुलम jn ला उतरलो आता हॉटेल शोधा हॉटेल online बुक केल्यामुळे शोधायचच त्रास नेट बघून केदार ला समजेना कुठे जायचे शेवटी विचारले बाहेर पडलो कुणाल ने रिक्षा विचारली प्रत्येकी30 रु म्हणाला इलाज नव्हता कंटाळा आलेला 3रिक्षा केल्या हॉटेल जवळ त्याने सोडलं 90रु दिल्यावर तो रिक्षावाला प्रामाणिक निघाला त्याने 40 घेतले 50 परत दिले बर वाटल नाहीतर सगळे लुटत असतात मग मागच्याना मी 40-40दिले हॉटेल ला पोचलो हॉटेल चंद्रिका रेसिडेन्सी ( 1 Diwans Road, Near TDM Hall Ernakulam, Kochi। ph 083770 04514) मस्तच होत हॉटेल स्वच्छ टापटीप आणि एअर कण्डीशन (900₹,ac,ब्रेकफास्ट)पहिल्यांदा सर्वांनी गरम पाण्याने अंघोळ केली फ्रेश वाटलं तिथं पर्यंत 6pmवाजले संध्याकाळ चे हॉटेलात थांबण्या पेक्षा जाऊ फिरायला म्हणून मरीन ड्राइव्ह ला जायला बाहेर पडलो.


बाहेर पडल्यावर आधीच कंटाळाआलेला सगळे म्हणाले रिक्षा करू सहज लक्ष गेलं मरिन ड्राइव्ह रोड ला बऱ्याच बस चाललेल्या सहज एकाला विचारलं ते म्हणालो भरपूर गाड्या आहेत कुठलीही पकडा तेवढ्यात केदार ला आठवलं की त्याला रेझर घ्यायचं आहे समोर मॉल दिसला तो5मि निटात जाऊन येतो म्हणाला इथे उभे राहण्यापेक्षा स्टॉप ला जाऊ म्हणून पुढे गेलो मग स्टॉप ला गेलो रस्ता क्रॉस करे पर्यंत 2 गाड्या गेल्या केदार नाही आला अमेय ला सांगितल्यावर तो म्हणाला पैज लाव केदार 20मिनिट नाही येत अमेय पैज जिंकला केदार नाही आला आपण निघू त्याला डायरेक्ट यायला सांगू अस ठरवून आम्ही निघालो बस ने 56 रु तिकीट( 8जणांचे) स्टॉप ला उतरून 10मी चालावं लागत पोचलो मुंबई सारखाच बीच पण इथे बोटी ची सुविधा होती 100रु माणशी 1तास(100रु म्हटल्यावर जातंय कोण) थोडा time pass केला स्वरा ला तहान लागली म्हणून थोडं फिरत पुढे गेलो तेवढ्यात केदार आला (आला बुवा) त्या करता बऱ्याच लोकांनी मेहनत घेतली नंतर नेहमी प्रमाणे कुणी कॉफी कुणी चहा कुणी थंड घेत 5-10मिनिट काढली तिथेच ग्राउंड वर कुठल्यातरी राजकीय पार्टी चे लोक जमलेले मल्याळम भाषेत बडबडत होते काही वेळात काही लोकांनी फटाके फोडले (मला वाटलं केदार पोचल्याचा आनंदात फोडले असावेत) स्वरा ला हे बघून गंमत वाटत होती अंधार पडलेला हॉटेल जवळ मंदिर होत ते बघावं म्हणून लवकर निघालो कुणाल अमेय केदार म्हणाले आम्ही चालत येतो ते आले आम्ही बस पकडली पण कुठल्या स्टॉप ला चढलो ते आठवेना कंडकटर ला अंदाजे सांगितलं त्याने पण अंदाजे च सोडलं(चुकीच्या ठिकाणी) तिथून रिक्षा केली मग ते अंजनेंय मंदिर आणि शँकर मंदिर बघितलं छान होत आणि विशेष पूर्ण मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तेलाचे दिवे समया छान वाटलं तेवढ्यात कुणाल अमेय केदार आले ते भलत्याच मंदिरात गेलेले असो त्या देवाने त्यांनाच बोलवलं असेल असं समजून आम्ही गप्प बसलो ,त्यांनी दर्शन घेतलं भूक लागलेली जवळ नेट वर बघितलं एक हॉटेल होत श्रीकृष्ण inn मला तो आधी बंगलाच वाटला बोर्ड लावला म्हणून हॉटेल एवढंच, पण डिसेंट होत हॉटेल, मस्त सजावट जेवण ठीक होत ,सर्व जेवले 2053 बिल झालं ते भरून बाहेर येऊन हॉटेल मध्ये पोचलो 3ऱ्या माळ्यावर गेल्यावर एकेकाला आठवलं की रूम मध्ये extraबेड नाही पाणी नाही, टॉवेल नाही ,मग फोनाफोनी केली त्याने टॉवेल सोडून सर्व दिल आणून परत खाली जाऊन आणलं सर्वांनी उद्या -7:30-8ला भेटायचं अस ठरवून निरोप घेतला.


केरळ मघ्ये जानेवारीत पण जाम गरम होत होत एवढा प्रवास चालणं वगरेअसेल कदाचित Ac असल्याने झोप मात्र मस्तच लागली सकाळी फ्रेश झालो 6:15 ला रिक्षेप्शन ला फोन केला की गरम पाणी येत नाही त्याने सांगितलं की 10वा येत हे ऐकून धक्का बसला हॉटेल ने तस सांगितलं किंवा लिहिलं पाहिजे असो निघायचं असल्याने सर्वांनी थंड पाण्याने अंघोळ केली तेवढ्यात ड्रायव्हर ने फोन केला की मी आलोय मी तयार होतो त्यामुळे त्याला भेटलो खाली जाऊन सतीशन नाव त्याच( 919747465444) एका त्रयस्थ मार्फत त्याला शोधून काढला होता तो हिंदी बोलणारा असल्याने बर होत आता आज पासून(16/1/18) पुढे 20/1/18,, एअरपोर्ट ला सोडेपर्यंत पर्यंत तोच आम्हाला फिरवणार होता सर्वांनी हॉटेल चा (फुकट असणारा)भंकस चहा नाश्ता केला आणि निघालो पहिल्यांदा मत्ताचेरी पॅलेस मंगळवारी बंद असतो आणि काम चालू होतं म्हणून स्कीप केला थेट कालडी गाठलं 30km आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान तिथे पोचलो एका स्तूप जवळ आम्हला सोडलं 5रु तिकीट प्रत्येकी च्यायला वर काहीच नाही फुकट 168 पायऱ्या चढलो तस माहिती आहे शंकराचार्य च्या जन्मापासून ची पण मल्याळम मध्ये असो पुढे जन्म ठिकाणी गेलो शारदा पीठ मस्त ठिकाण होत सरस्वती सूक्त म्हंटल फोटो काढले बाजूला वेद पाठशाळा पण आहे जायचं होतं पण प्रवेश नव्हता आणि इतकी वर्षे काढली पाठशाळेत म कशाला जा म्हणून गेट वर फोटो काढला बाजूला मंदिर होत गेलं तर बंद (सकाळी10वाजता)चला10रु वाचले म्हणून पुढे जाऊन थंडा प्यायलो गाडीत बसलो आता आथिरपल्ली धबधबा पाहायला जायचं होतं रस्त्यात एअरपोर्ट दिसलं मस्त होत, रस्ते पण छान होते अचानक एक लेफ्ट घेतला आणि खराब रस्त्याला सुरवात झाली 30मिनिटांनी उतरलो एक कुठली तरी बाग होती 10रु तिकीट पुलावरून जायचं पलीकडे गेलो तर बागेत जायचं 25रु तिकीट मग काय सांगायला नकोच त्याच पुलावरून परत आलो पूल छान होता वेगळ्या स्टाईल ने बांधलेला तिथे पुन्हा मूळ जागेवर येऊन चहा घेतला फोटो काढले फोटो काढताना मंदार ने बॅग केदार कडे दिली केदार ने फोटो काढताना बाजूला ठेवून दिली(आणि ती न्यायला विसरला) निघालो पुढे 30मीनीट आथिरपल्ली आल्यावर अचानक मंदार च्या लक्षात आलं की त्याची बॅग राहिली सगळे घाबरले भारतात हरवलेली वस्तू एखादी गोष्ट परत मिळायला नशीब लागत आरोप प्रत्यारोप झाले शेवटी केदार ने स्वतः च्या चुकीची कबुली दिली सगळे गॅस वर कारण मोबाईल id कार्ड आधार कार्ड atm पॉवर बँक सर्व होत आधार कार्ड शिवाय विमानात प्रवेश मिळणं कठीण मग फोनाफोनी झाली मंदार नशीबवान निघाला बॅग सापडली हुश्शह्ह त्या खुशीत सर्वांनी अननस खाल्लं फॉल कडे निघालो 300 सर्वांचं तिकीट पार्किंग वगरे धरून बरेच चालल्यावर मध्ये माकड झाड भरपूर ,जाम ऊन लागत होतं एकदाचे पोचलो घोर निराशा म्हणतात ती झाली पाणी च नाही शेवटी लोक एवढं जाऊन हे बघितलं नाही असं म्हणण्यापेक्षा बघितलं बुवा म्हणून एकदाचे फोटो काढून बाहेर पडलो थंड प्यावस वाटत होतं जवळ दुकान होत कुठला तरी sprait सारख कोल्ड्रिंक होत मस्त 10रु 10बाटल्या घेतल्या 1स्वराला तीपण मजेत पित होती आणि सोडायला तयार नाही मी मयुरा पूजा स्वरा परतीच्या मार्गावर चालायला लागलो वाटेत माकडांनी मयुरा पूजा च्याहातात थंडा ची बाटली बघितली त्यांना ही वाटलं प्यावस त्यांनी एक गेम सुरू केला थेट पूजा वर हल्ला बोल केला एखाद्या बॅट्समन ने आल्यावर पहिल्याच बॉल वर सिक्स मारावा तस त्यांची हूल यशस्वी ठरली पूजा बाटली टाकून पळाली ते गेम जिंकले बक्षीस म्हणून बाटली मिळवली आता त्यांनी मोहरा मयुरा कडे वळवला मयुरा समजून चुकली आणि पूजा किंचाळल्या मुळे तिनेही बाटली टाकली शेवटी रिकाम्या हाताने स्वरा च रडणं ऐकत आम्ही खाली उतरलो उतरल्यावर नवीन बाटली स्वरा ला दिली थांबली काही वेळाने बाकीचे पण आले त्यांचाही बाबतीत तेच घडलं पण माकडांना हात हलवत जावं लागलं मग भूक लागलेली जेवावे म्हणून हॉटेल शोधलं जवळ मिळालं तिथे सरस्वती नाव नॉर्थ इंडियन थाळी घेतली 150रु प्रत्येकी जेवून ताक पिऊन बाहेर पडलो ते मंदारच पाकीट घ्यायला गेलो घेतलं सर्व वस्तू होत्या 5km चा जाण्याचा वेळ गेला मग आता पुढे गुरुवायूर ला जायचं होतं त्रिवेंद्रम कोझिकोडे हायवे मस्तच काही झोपले काही जागे काही उलटी टोपी घालून बसलेले प्रवास पुढे सुरू झाला त्रिशूर पर्यंत तो आम्हला चालणार होता पुढे सिंगल रोड होता.


अखंड प्रवास चालू होता मध्येच कुणाल म्हणाला चहा ला थांबायचं का घड्याळाकडे नजर टाकली 3:45 झालेले म्हणालो4;-4:30ला थांबू परत 20-मिनिट गेली आणि मला परत चहाची आठवण करून देण्यात आली ठीक आहे चहा साठी उभी करा असे सांगितले त्यांनी तो निरोप ड्रायव्हर कडे फॉरवर्ड केला ड्रायव्हर ने एका पॉश हॉटेल जवळ उभी करणार एव्हढ्यात चहाच्या महागड्या खर्चाचे धोके लक्षात आल्याने मी मागूनच ओरडलो इथे नको टपरीवर उभी करा पडत्या फळाची आज्ञा मानून सर्वांना(बायका सोडून) ते धोके लक्षात आल्याने गाडी पुढे दामटली एका टपरीवर चहा प्यायला पूजा उतरली तिला आणून दिला पुढे प्रवास सुरु केला गुरुवायूरला जात असतांना आम्हांला वाटेत अनेक चर्च उभारलेली दिसली, केरळमध्ये ख्रिश्चन लोक बहुसंख्य असल्याने चर्चची संख्याही तुलनेने जास्त होती. शिवाय रस्त्याच्या कडेने बांधलेले देखणे बंगले दिसत होते. प्रत्येक बंगल्याची वास्तू वेगळ्या पद्धतीने सजवलेली दिसत होती आणि प्रत्येक बंगल्याभोवती बाग दिसत होती. बागेत सुपारीची, नारळाची झाडं दिसत होती, त्यावर मिऱ्याचे वेल चढवलेले दिसत होते. वाटेतल्या बाजारांमध्ये फळांची भरपूर दुकानं दिसत होती आणि त्या दुकानांमध्ये डाळींब, संत्री, अननस, केळी, पपई, रामफळ, सफरचंद, कैऱ्या अशी विविध फळं दिसत होती.   

     संध्याकाळी सहा च्या सुमारास आम्ही पुन्नातूर कोटा इथल्या हत्ती प्रशिक्षण केंद्रापाशी आलो. गुरुवायूर मंदिरात अर्पण केलेले हत्ती इथे ठेवतात मैदान ओलांडून आम्ही प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारापाशी आलो. 5वाजल्याने ते बंद झालं होतं हॉटेल बुक नव्हतं कारण गुरुवायूर ला आमच्या आवडी चे oyo नव्हतं त्यामुळे बाकीच्या हॉटेल (लोकांची) ची तोंड बघायला लागणार होती मी ड्रायव्हर आणि महेश हॉटेल शोधायला गेलो कारण मी पैसे देणार होतो महेश घासाघीस करणार होता आणि ड्रायव्हर आम्हाला इंग्लिश मल्याळम(त्यांना हिंदी मराठी)येत नसल्याने त्यांचा भाषेत बोलणार होता बाकीचे तिथेच उभे होते आधी आम्ही पंचजन्यम म्हणून मंदिराचे गेस्ट हाउस होते तिथे गेलो ते बंद त्यांनी सल्ला दिला कौस्तुभम म्हणून मंदिराचेच तिथे जा तिथे गेलो रूम होत्या पण स्वच्छ नाही वाटल्या स्वच्छ होत्या त्या महाग वाटल्या त्या रूम बाहेरच्या पेक्षा स्वस्त होत्या आम्हाला ac हव्या असल्याने नॉन ac चा बोर्ड बघितलाच नाही त्या 3बेड 1200ru ac डीलक्स 1600(2जण) सुईट 2000(तो बाद) आणि गम्मत म्हणजे आम्हला 2च्या 4 रुम घ्यायला हव्या किंवा 3बेड च्या 3 रूम पण आमचं ठरलं 1रुम मध्ये पूजा मयुरा राहतील बाकीच्या त आम्ही पण त्याने axtra काहीही देणार नाही(उशी पांघरून बेड वगरे) काय करावं असा प्रश्न पडला पण बाकीच्या हॉटेल चे रेट बघता हेच परवडेल म्हणून हेच घेऊ अस ठरवून मी माझा id काढून काउंटर वर ठेवला एवढ्यातएवढ्यात केदार चा महेश ला फोन आला तो म्हणाला म्हणाला मी सहज फिरत असताना एक बंगल्या समोर उभा राहिलो तिथे बंगलेवल्याने रूम हवी का म्हणून विचारणा केली 3500 पटवला आहे रूम चांगल्या आहेत इथे या बाकी केदार कसाही असला तरी त्याची चॉईस चांगली आहे तो फालतू रूम घेणार नाही म्हणून तडक आम्ही तिथून निघालो प्रथम दर्शनी बंगला चांगला होता तसही 12तासांचा प्रश्न होता आम्ही एकाच रूम मध्ये2रूम होत्या तिथे मी मंदार मयुरा पूजा स्वरा राहिलो वरच्या रूम 4बेड चा होता तिथे बाकीचे राहिले
     तिथून गुरुवायूर मंदिर अगदी जवळ असल्याने आम्ही मंदिराकडे पायी चालत निघालो. मंदिराजवळ असलेल्या दुकानांमधल्या वस्तू पाहून, परत येतांना त्यातल्या काही वस्तू खरेदी करायच्या असं मी ठरवलं होतं. मंदिराजवळ गेल्यावर तिथे दर्शनासाठी असलेल्या पाचसहा रांगा दिसल्या. त्यात स्त्रियांसाठी एक वेगळी रांग होती. मंदिरात पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या स्त्रियांना प्रवेश होता. (आम्ही लोकांचं ऐकून फुकट साड्या घेऊन गेलो)पुरुषांसाठी मात्र धोतर किंवा लुंगी नेसून मंदिरात जाणं अनिवार्य होतं. रांगेतल्या लहान मुलांनाही छोट्या लुंग्या नेसवलेल्या दिसत होत्या.
     रांगांमध्ये दर्शनासाठी उभे राहिलो होतो, पण एकाचीही रांग पुढे सरकेना. केरळमध्ये देवाच्या झोपण्याच्या, जेवण्याच्या इत्यादी वेळांना मंदिर बंद ठेवतात आणि त्यातल्या मधल्या वेळात लोकांना दर्शन घ्यायची संधी मिळते. अशाप्रकारे दिवसातून चारपाच वेळा तरी मंदिर बंद असतं.
     आमच्यादेखत काही रांगांमधल्या लोकांना मंदिरात सोडलं गेलं आणि मग साखळ्या लावून रांगेचा मार्ग बंद केला गेला. उरलेले लोक बराचवेळ रांगेत एकाचजागी तिष्ठत उभे होते. अजून अर्ध्यापाऊण तासाने पुन्हा काही रांगांमधल्या लोकांना आत सोडलं गेलं आणि थोडावेळ दर्शन बंद झालं. तिथे सतत एकाच जागी उभं राहून राहून आमच्या पायांना रग लागायला लागली होती. रांगेतल्या काही लहान मुलांना गर्दीची सवय नसल्याने ती मोठ्याने भोकाड पसरून रडत होती. साधारण पाउण तास असा काढल्यानंतर मग आम्हांला दर्शनाची संधी मिळाली. आम्ही ज्या वेगवेगळ्या रांगेत उभे होतो, त्या सर्व रांगांमधल्या लोकांना एकाचवेळी आत सोडलं होतं.
     आत गेल्यानंतर आम्हांला स्त्रियांसाठी असलेली वेगळी रांग, पुरुषांसाठी असलेली वेगळी रांग या सगळ्या रांगांची ऐशीतैशी झालेली दिसली. आत सगळ्या रांगा एकत्र होत होत्या. दर्शनमार्ग रुंद असल्याने लोक आत रेटारेटी करून घुसत होते आणि त्यात एकाऐवजी नवीन तीन रांगा तयार झाल्या होत्या. या रांगामध्ये स्त्रीपुरुष सगळे एकत्र मिसळलेले होते, बहुतेक सगळेजण एकमेकांना ढकलत होते, तिथे मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये असावी तशी गर्दी झाली होती. त्यातच लहान मुलं जीव तोडून रडत होती. मंदिरांबाहेर दर्शनासाठी टीव्ही स्क्रीन लावला असता, तर रांगेत उभं राहण्याची इच्छा नसलेल्यांना त्या स्क्रीनवर देवाचं दर्शन घेऊन परस्पर जाता आलं असतं. पण तशी सोय तिथे नव्हती.
     या सगळ्या गर्दीतून अखेर आम्ही गुरुवायूर कृष्णाच्या अंदाजे फूटभर उंचीच्या छोट्याशा मूर्तीचं दर्शन घेतलं. कृष्णाच्या मूर्तीचा बहुतेक भाग कपड्यांनी आणि फुलांनी झाकलेला होता पण चंदनाने माखलेला चेहरा तेवढा दिसत होता. दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्याबाहेर असलेल्या प्रदक्षिणामार्गावरून आम्ही बाहेर पडलो. तिथे बाहेरच्या मोठ्या प्रदक्षिणामार्गावर एक हत्ती उभा होता. तिथल्या एका दरवाजातून अजून एक हत्ती आत येत होता. त्याच दरवाजातून आम्ही बाहेर आलो.
     तिथून आम्ही मंदिराबाहेर असलेल्या मंडपाकडे आलो. भजन, प्रवचन इत्यादींसाठी तो मंडप बांधलेला होता. मंडपात स्टेजसमोर खुर्च्या ठेवलेल्या होत्या. काही लोक त्या खुर्च्यांवर बसून चक्क झोप काढत होते. काहीजण मंदिरातर्फे प्रसाद म्हणून मिळणाऱ्या जेवणासाठी तिथे थांबलेले होते. त्या मंडपात बसून आम्ही मंदिरासमोरचा परिसर न्याहाळू लागलो. आता दर्शनासाठी आलेल्या लोकांची गर्दीही कमी झाली होती. लोकांच्या रांगा पटापट पुढे सरकत होत्या. थोड्या वेळाने रांगेतले सगळे लोक आत गेले आणि मंदिराचे दरवाजेही बंद झालेले दिसले.
     रात्रीचे नऊ वाजले होते, आम्ही मंदिरातून बाहेर पडायच्या मार्गाने आत गेले, तेव्हा मला तिथे व्यवस्थित  शृंगारलेला हत्ती असलेले दिसला दर्शनासाठी आत गेलेल्या लोकांची तिथे गर्दी जमली होती, काहीजणांनी मोकळ्या जागांमध्ये बसून घेतलं होतं. गाभाऱ्यासमोरच्या उंच दीपमाळा पेटवलेल्या दिसत होत्या. थोड्या वेळात शृंगारलेल्या  हत्तींला पुढे आणून गाभाऱ्यासमोर उभं केलं होतं आणि पोलिसांनी बाहेर पडण्याचा रस्ता बंद केला होता. पुजाऱ्यांनी (बहुधा) तो हत्ती देवाला अर्पण करण्याचा विधी सुरू केला. तो विधी फार सुंदर वाटत होता. आम्हला थोडा वेळ तिथेच उभं राहून तो विधी पहायला आवडलं असतं, पण हॉटेलवर रात्रीच्या जेवणासाठी वेळेत जाणं आवश्यक होतं. त्यामुळे नाईलाजाने आम्ही तिथून निघाले आणि एका मधल्या दरवाजाने बाहेर आले.
     आम्ही हॉटेलकडे परत निघालो, बाहेर च खाण आटपल टेस्टी होत रामकृष्ण इन् आणि sarvana bhavan तिथून येताना आईस्क्रीम खाऊन रूम वर आलो झोपलो सकाळी9:15च्या सुमारास आम्ही पुन्नातूर कोटा इथल्या हत्ती प्रशिक्षण केंद्रापाशी आलो. गुरुवायूर मंदिरात अर्पण केलेले हत्ती इथे ठेवलेले असतात. आमची गाडी मैदानात पार्क केली तिकीट काढलं फोटो काढायला परवानगी नाही म्हणून कॅमेरा नेता नाही आला आत ले दृश्य छान होते स्वरा जामच खुश झाली बाबा तो बघ हत्ती आई तो अस चित्कारतं होती प्रथमदर्शनी हत्ती 3-4झाड सोंडेत घेऊन चालला होता तिथेच एक माहूत नळीने त्याच्या अंगावर पाणी सोडत
     आत गेल्यानंतर काही हत्ती जवळ बांधलेला हत्ती जवळ त्याच्या इथे अशा अर्थाची पाटी लावलेली होती, की 'हा हत्ती मस्त झालेला आहे. तो केव्हाही हिंसक होऊ शकतो, तरी त्याच्या समोर फार वेळ उभं राहू नये किंवा त्याच्या समोर उभं राहून त्याला कोणत्याही प्रकारे डिवचू नये.' ती मी पहिल्यांदाच असा मस्त झालेला हत्ती बघत होते. तो हत्ती मात्र इतर मस्त न झालेल्या हत्तींच्या तुलनेत शांत उभा होता.
     तिथून पुढे इतर काही हत्ती आणि हत्तीणींना बांधून ठेवलेलं होतं. त्यातले काही हत्ती वयस्कर होते, काही मध्यमवयाचे होते,  बहुतेक हत्तींपुढे खाण्यासाठी झाडपाला टाकलेला दिसत होता. काही हत्ती शांतपणे तो झाडपाला खात होते, काही हत्ती नुसतेच स्वतःच्या शरीरावर पाणी उडवत स्नान करत होता तो माहूत तिला तसं न करण्याबाबत दटावत होता. शांतपणे झाडपाला खाणारा हत्ती   बघण्यासारखाच!  पुढच्या भागात काही मस्त झालेले हत्ती उभे होते, ते मात्र शांतपणे उभे होते. काही एकर जागा असलेल्या त्या परिसरात त्यावेळी चाळीस-पन्नास हत्ती ठिकठिकाणी उभे असलेले दिसत होते. बहुतेक हत्तींच्या आसपास मोठी झाडं होती. त्या झाडांवरून काही खारी खाली येऊन त्यांचं अन्न शोधत होते. हत्तीच हत्ती चहूकडे      तिथून अजून थोडं पुढे गेल्यावर एक काळ्या कुळकुळीत रंगाचा वयात येत असलेला हत्ती दिसला. त्याचा माहूत त्याला प्रशिक्षण देत होता. माहूत हत्तीला आज्ञा देत होता आणि त्याप्रमाणे तो हत्ती पाय पुढे करून दाखवणे आणि मग तो मागे घेणे, सोंडेने नमस्कार करत दिलेली वस्तू घेणे इत्यादी कसरती करून दाखवत होता. थोड्या वेळाने माहूताने आज्ञा देणं थांबवलं आणि तो इतर कामात गुंतला, मग तो जिज्ञासू हत्ती स्वतःहून त्या सगळ्या कसरती करून बघायला लागला.
     तिथून थोड्या अंतरावर एका लाकडी पिंजऱ्यात एकमेकांकडे पाठ केलेल्या स्थितीत दोन हत्ती ठेवलेले होते. ते बहुधा परराज्यातून पकडून आणून मंदिराला अर्पण केले होते. त्यांचा तिथल्या भाषेशी नीट परिचय होऊन त्यांना त्या भाषेतल्या आज्ञा नीट समजेपर्यंत त्यांना तिथेच ठेवलं जाणार होतं, अस
     हे हत्ती बघतांना आमचा अर्धा तास वेळ तरी सहज निघून गेला होता.मग तिथून बाहेर पडून आम्ही अलपुझ्झा(alleppy) च्या दिशेने कूच केली.


क्रमशः

श्री भूषण कात्रे