DevDharm —


*रामेश्वर*


रामेश्वर तीन प्रकारे समास सिद्ध करता येतो .

*रामस्य ईश्वरः '* (श्री रामाचे ईश्वर - महादेव) अर्थात् षष्ठी तत्पुरुष समास होतो .
स्वतः महादेवांनी - *' रामः ईश्वरः यस्य सः '* (श्री राम ज्यांचा ईश्वर आहे ते - महादेव) अर्थात बहुव्रीहि समास होतो .
इन्द्रादि देवगण *' रामश्चासौ ईश्वरश्च '* (जो राम, तोच ईश्वर) अर्थात कर्मधार समास होतो .
श्री पद्मपादाचार्य जी यांनी या व्याख्या केलेल्या होत्या .

श्री रामांना महादेवा पेक्षा श्रेष्ठ मानणारे वैष्णव प्रथम अर्थ घेतात , महादेवाला श्री रामापेक्षा श्रेष्ठ मानणारे शैव द्वितीय अर्थ घेतात व सर्व ईश्वरीय रुपात स्वरूपतः अभेद मानणारे अद्वैतवादी तृतीय अर्थ स्वीकार करतात .
' रामेश्वरम् ' पद मध्येच हरि-हर-अभेद प्रतिपादन केले आहे , त्यामुळेच या तीर्थाचे माहात्म्य खूप आहे .
।। जय श्री राम ।।

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*