DevDharm —


।। षडरिपु ।।


काम , क्रोध, लोभ , मोह , मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू ,सहा शत्रू असे म्हणतात.

या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात.

१. काम म्हणजे अति व अनैतिक लैंगिक भावना.

२. क्रोध म्हणजे राग .

३. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिळविण्याची इच्छा, अतीव प्रेम.

४. मोह म्हणजे अज्ञानामुळे एखाद्या क्षणभंगुर गोष्टीशी मन संलग्न करणे, गुंतविणे.

५. मद म्हणजे गर्व, अति अभिमान.

६. मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष आहेत. हे सहा दोष ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला "साहेब" असे म्हणतात.

या सहा दोषांना सहज धारण करणारास "साधारण" म्हणतात.

या सहांना मान्य करणारास "सामान्य" म्हणतात.

या सहांना आपल्या धाकात ठेवणारास "साधक" म्हणतात.

या सहांना अधू करणारास "साधू" म्हणतात.

या सहांचा संपूर्ण अंत करणारास "संत" म्हणतात.

आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन स्वत:ची आत्मोन्नती करतो त्याला "समर्थ" म्हणतात.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी