DevDharm —


*भोजपत्र*


भोजपत्र म्हणजेच भूर्जपत्र विशिष्ट झाडाच्या खोडाच्या पातळ कागदासारख्या पापुद्र्यावर लिखाण केलं जायचं.
भारतातील बहुतेक प्राचीन व मध्ययुगीन हस्तलिखिते भूर्जपत्र व ताडपत्र यांवर लिहिलेली आहेत.
हीं झाडें हिमालयावर सांपडतात. याची साल कागदापेक्षांहि अधिक टिकाऊ आहे.
. हिंदुस्थानांतील बरेच प्राचीन हस्तलिखित ग्रंथ याच भूर्जपत्रांवर लिहिलेले होते. औषधी मंत्र ( विंचू, सर्प यांच्या दंशावरील मंत्र) लिहिण्याच्या कामीं याचा फारच उपयोग करण्यांत येतो. याचे उपयोग अनेक आहेत. पार्सलवेष्टण, हुक्याच्या नळीचें वेष्टण, छत्रीचा अभ्रा इत्यादि जिन्नस याचे तयार करतात. सौगंधिक व जंतुनाशक गुणहि याच्या अंगीं आहेत. याचें लांकूड किडत नसल्यामुळें त्याचा इमारतीच्या कामीं चांगला उपयोग होतो.
जडीबुटी व पसारेवाले यांच्या दुकानात सर्वत्र भोजपत्र मिळू शकते .

संकलन :- अशोककाका कुलकर्णी