DevDharm —


|| अनुष्ठान ||

आयुष्य भर आपलं मन शरीर इंद्रिय वासना आपल्या काबूत ठेऊन आचरण ठेवणे म्हणजे अनुष्ठान
अनुष्ठान करण्या साठी काही आपण स्वतःवर लादले नियम असतात त्यात रोजचा नित्यक्रम नियमित पणे करणे त्यात बाधा न आणणे , ठरलेल्या वेळी ठरलेली गोष्ट करणे ठरलेल्याच ठिकाणी करणे उदा पूजा अर्चा नामस्मरण जेवण इ .
जर एखाद्या दिवशी ठरून गोष्टी केल्या तर दिनक्रम होतो
दररोज ठरवलेल्या दिनक्रम नुसार अनेक दिवस वागल्यास दिनचर्या होते ,
अनेक महिने किंवा वर्ष केल्यास नित्यक्रम होतो ,
आणि 12 वर्ष केल्यास त्याला तप म्हणतात
आणि अनेक तपाचे मिळून अनुष्ठान बनते .
अनुष्ठान म्हणजे एखादी गोष्ट पक्की करणे. आपल्या बाह्य़ आचरणाला स्वरूपस्थ राहण्याच्या आंतरिक वृत्तीची जोड देणे अर्थात जगण्याला स्वरूपभानाचं अनुष्ठान देणं, हा साधकाचा अभ्यास आहे. तो इतका सोपा मात्र नाही.
बद्धावस्थेत प्रपंचातच माणूस जखडला असतो. त्यापलीकडे त्याला कशाचीही जाणीव नसते.
मुमुक्षु अवस्थेपासून ते साधकावस्थेपर्यंत प्रपंचाचा प्रभाव नष्ट झाला नसला तरी कमी होऊ लागला असतो. तरीही प्रपंचमोह कधी उफाळेल, याची भीती मनातून गेली नसते.
अनुष्ठान असले तरच मनुष्य त्यामधून तरुन जातो !

संकलन :- अशोककाका कुलकर्णी