DevDharm —


फाल्गुन कृ. ७
बुधवार २७ मार्च २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
काल भगवान श्री परशुरामांचा जन्म उपनयन व काश्यपांक़डे विद्याग्रहण हा भाग काल पाहिला आज पुढे ऋचीक महर्षींच्या सिध्द केलेल्या क्षात्रतेजाच्या चरुभक्षणामुऴे व वरामुऴे भगवान श्री परशुरामांना धनुर्विद्येचे व शस्त्रविद्येचे प्रचंड आकर्षण होते .
#अन्नसंस्कार हा सर्वात महत्वाचा भाग आपण आज अभ्यासणार आहोत .आपण ज्या हेतुने व ज्या पध्दतीने अन्न शिजवतो तेच सर्व गुणधर्म अन्नात समाविष्ट होतात व अन्नसंस्कार तसेच होतात व ते अन्न भक्षण करणार्या माणसाची बुध्दि तद्वतच होते असे शास्त्र आहे.
काय कटकट आहे असे म्हणुन कंटाऴुन किंवा भांडणे करुन शिजवलेले अन्न हे तामसीच होते व ते भक्षण करण्याची बुध्दि तशीच होते.
या विरुध्द माझ्या द्वारे बनवण्यात येणार्या अन्नाने भगवंताची व देवतांची व घरच्यांची क्षुधा शांत होणारे त्यांना तृप्ती लाभणार आहे हा भाव ठेवुन शुचिर्भूतपणे जे अन्न शिजवले जाते ते सत्वगुणांनी समृध्द असते व भक्षण करणार्याची बुध्दि देखील सात्विकच होते
क्षत्रियांचे गुणधर्म काय असावेत याचे विवेचन भगवद्गीतेत दिले आहे
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम् ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ।। (गीता १८.४३)
शूरवीरपणा, तेज, धैर्य चतुरता, युध्दात पाठ न दाखवणे, दान देणे व स्वामिभाव हे क्षत्रियांचे स्वभाव गुण असतात भगवान श्री परशुरामांच्या आजीने याच गुणधर्मांनी युक्त असलेला चरु भक्षण केल्याने हे गुमधर्म आपसुकपणे त्यांचाकडे आले त्याच सोबत जामदग्नींच्या द्वारे ब्राह्मतेजाचे गुणधर्म त्यांच्याकडे आले
अध्यापनमध्ययनंच यजनं याजनं तथा ।
दानं प्रतिग्रहं चैव ब्राह्मणानामकल्पयत् ।। (मनुस्मृति १.८८)
अध्ययन (शिकणे) अध्यापन (शिकवणे) दान देणे व दान घेणे, स्वत:करता यज्ञ करणे व यजमानांकरता यज्ञ करणे हे सहा ब्राह्मणांचे गुणधर्म आहेत हि सहा कर्मे आहेत.
भगवान परशुरामांच्या चरीत्रात या ब्राह्म व क्षात्र कर्मांचा समन्वय पाहता येतो.
भगवान श्री परशुरामांना या मुऴेच शस्त्रविद्येचे आकर्षण निर्माण झाले ते यामुळेच श्री परशुराम भगवंतांनी गंधमादन पर्वतावर तपाचरण करुन शंकरांना प्रसन्न करुन घेतले व त्यांच्याकडुन धनुर्विद्या ग्रहण केली ब्राह्म, वैष्णव, रौद्र, अाग्नेय, वासव, नैऋत्य अशी जवऴपास एकेच्चाऴीस अस्त्रे व परशू हे शस्त्र देखील भगवान श्री परशुरामांनी शंकरांकडुन प्राप्त केले व या विद्येचा प्रसार देखील भगवान परशुरामांनी केला
शिवो भार्गवरामाय धनुर्विद्यामदात् पुरा ।
पारम्पर्येण शिष्याणां तेन लोके प्रचारिता।।
शिवशंकरांने भार्गवरामांना धनुर्विद्या दिली व भार्गवरामांनी ती विद्या शिष्यपरंपरेने पुढे दिली द्रोणाचार्य, भीष्म व कर्ण असे भगवान श्री परशुरामांचे प्रसिध्द पराक्रमी शिष्य होते
तुर्त लेखन मर्यादा

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com