DevDharm —


भुमौ दिपं योर्पयति सचांधः सप्तजन्मसु।
भुमौ शंखंच संस्थाप्य कुष्ठन् जन्मांतरे लभेत ।।


काल पाठविलेल्या वचनाला अनुसरून जो कुणी जमिनीवर विना आधार दिवा ठेवेल तो सप्त जन्म अंध व जो शंख संस्थापिल तो कुष्ठी होईल ।

(देवी भागवत)

-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-


तिष्ठन्नासीन: प्रव्हो वा नियमो यत्र नेदृशः।
तदासींनेन कर्तव्यं न प्रव्हेण न तिष्ठता ।।


अमुक एखादे कर्म हे बसून करावे कि वाकून वा उभे राहून करावे असा नियम उल्लेखित नसल्यास ते कर्म उभ्याने अथवा वाकून न करता बसूनच करावे ।

(गृह्यसूत्र भाष्य)


:---:--:--:--:--:--:--:--:--:--:--:--:--


भूतशुद्धी विहीनेन जपपूजादिकं कृतम् ।
सर्वं निरर्थकं विद्धि विपरितफलार्थदं ।।

भूत शुद्धी न करता जप ,पूजा आदी जी कर्म केली।जातात ती केवळ निरर्थकच होत नाहीत तर विपरीत फल देणारी सुद्धा होतात ।

(वसिष्ठ संहिता)सारंग दुर्गे ।नागपूर ।
7588187530