DevDharm —


मुक्तां शुक्तीं हरेरर्चाम् शिवलिंग शिवां तथा ।
शंखं प्रदीपं यंत्रं च माणिक्यम् हिरकं तथा ।।1।।
यज्ञ सूत्रं च पुष्पन्च पुस्तकं तुलसिदलम् ।
जपमालां पुष्पमालां कर्पूरचं सुवर्णकम् ।।2।।
गोरोचनं चदनंचं शाळीग्राम जलं तथा ।
एतान् वोढुमशक्ताहं क्लिष्टाच भगवनछ्रुनु ।।3।।

मोती, शिंपले ,विष्णू निर्माल्य,शिवलिंग,गौरी ,शंख,दीप,यंत्र,माणिक ,हीरा, जानवं, पुष्प,पुस्तक,तुलसीद्ल, जपमालां,पुष्पमाला,कापुर, सुवर्ण,गोरोचन,चंदन व शालिग्रामचे तीर्थ ह्या वस्तू पृथ्वी वर प्रत्यक्ष ठेवू नये
।अर्थात खाली काही आधार असावा ।

(देवी भागवत )


-- :--:--:--:--:--:--:--:--:--:--:-- --;--उद्धृत्य वामहस्तेन यत्तोयं पिबति द्विजः ।
सुरापानेन तत्तुल्यम् मनुराह प्रजापति: ।।

आपल्या डाव्या हाताने पाणी घेऊन जर कुणी द्विज ते पाणी पीत असेल तर तसे पाणी पिणे हे सुरापान केल्याचे फळ देणारे होईल ।म्हणजे सुरापान सम होईल ।अर्थात उजव्या हाताने पाणी पात्र घेऊन ते पाणी प्यावे । असे मनुचे वचन आहे ।

जलपात्रं तु निःक्षिप्य मणिबंधेच दक्षिणे ।
विप्रो भोजनकाले तु पिबेद्वामेन पाणिना ।।

पूर्वीच्या वचनास अनुसरून पाणी पिताना ते डाव्या हाताने पिऊ नये असे आपण बघितले ।परंतु भोजन करते वेळी उजव्या हाताने कसे प्यावे तर डाव्या हाताने पाण्याचे पात्र घेऊन ते उजव्या हाताच्या मनगटाचा आधार घेऊन ते जल प्राशन करावे ।।

(विधानपारिजातक )


सारंग दुर्गे ।नागपूर
7588187530