DevDharm —


गुरोर्यत्र परीवादो निंदा वापि प्रवर्तते ।
कर्णो तत्र पिधातव्यौ गंतव्यं वा ततो$न्यतः ।।

ज्या ठिकाणी आपल्या गुरूंच्या दोषांची चर्चा सुरु असते वा त्या गुरूंची निंदा ऐकावयास येते अश्या ठिकाणी त्या गोष्टी ऐकू येऊ नये म्हणून आपल्या हातानी एकतर आपले कान झाकावे अन्यथा त्या स्थानाचा तत्काळ त्याग करून अन्यत्र निघून जावे ।

( संस्कार गणपती )-- :--:--:--:--:--:--:--:--:--:--:--:--:--:--यस्य राष्ट्रे प्रजा: सर्वास्रस्यन्ते साध्व्यसाधुभि:।
तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तीरायुर्भगो गति:।।

दिग्विजया करिता निघालेल्या परिक्षिती राजाला एके ठिकाणी वृषभ रूपी धर्म व गोरुप धारण केलेली पृथ्वी यांचा संवाद ऐकायला येतो। यात वृषभ रूपी धर्म गोरुपा पृथ्वीस उपदेश करताना म्हणतो की हे साध्वी, ज्या राष्ट्रातील प्रजा ही दुर्जनां कडून होणाऱ्या अत्याचारामुळे अत्यंत त्रस्त झालेली असते । त्या राष्ट्रातील असावध असलेल्या राजाची कीर्ती ,आयुष्य ,भाग्य व परलोक ह्या चारही गोष्टींचा विनाश होतो ।म्हणजे तो ह्या चारही गोष्टींना मुकतो ।

(श्रीमद्भागवतम्)


सारंग दुर्गे ।नागपूर
7588187530