फाल्गुन कृ.८ गुरुवार
२८ मार्च २०१९
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
काल आपण अन्नसंस्कार, क्षात्र व ब्राह्म गुणधर्म व शंकरांना प्रसन्न करुन भगवान परशुरामांनी प्राप्त केलेली अस्त्रे शस्त्रे पाहिली आज पुढे
भगवान श्री परशुरामांचे चरीत्र हे आदर्शवत आहे जे शास्त्रप्रामाण्याने चालते. मानवी डोळ्यांनी त्याकडे पाहणे हा गाढवपणाच ठरेल.हे कसे ते लगेच सोधाहरण सांगतो
माणसाला "मन , बुध्दि, चित्त, अहंकार, वासना असतात त्या मानवी बुध्दिला किंवा मानवाने विकसीत केलेल्या यंत्रांना म्हणजे M.R.I किंवा सिटिस्कँन, एक्स रे, सोनोग्राफी यामध्ये दिसुन येत नाहित तरी देखील उपरोक्त मन आदि संज्ञांमुऴे घडणार्या घटना अापण नित्य पाहतो अथवा अनुभवतो
माणसाला मन असते बुध्दि असते, वासना असते, अहंकार असतो हे ज्ञान आपणास शास्त्रानेच दिलेले आहे .नास्तिकवादि देखील या हिंदु धर्म शास्त्र संज्ञाच वापरतात त्यांनी आपल्या बुध्दिकरता नवीन शब्द अजुन तरी योजला नाहिये, विवेक हा त्यांचा परवलीचा शब्द हा देखील हिंदु धर्मशास्त्रातच वर्णीत आहे त्यामुऴे नास्तिकवादि देखील काहि अंशी का होईनात शास्त्रवचनावर विश्वास ठेवतात भले एरवी ते दिसणार्या गोष्टिंवर च विश्वास ठेवत असले तरी .
बुध्दि दिसत नसली किंवा यंत्राने ती दाखवता आली नाहि तरी नास्तिक फेक्युलर त्यावर विश्वास ठेवतात.
भगवान श्री परशुराम हे तर प्रत्यक्ष भगवंतांचा आवेश अवतारच आहेत ते तर १००% शास्त्र पालन करणार यात संदेह का धरावा? म्हणुनच प्रत्यक्ष योगेश्वर भगवान कृष्णाने "तस्मात शास्त्रं प्रमाणं ते " हे ठाम सांगीतले आहे व आपण देखील हेच अनुभवले पाहिजे.
#आपस्तंब_धर्मसुत्रात यावर सुंदर वचन देखील आहे
यं त्वार्या क्रियमाणं प्रशंसन्ति स धर्मो यं गर्हन्ते सोऽधर्म:।। (७.७)
सत्पुरुष ज्या आचरणाचे पालन करतात ज्याची प्रशंसा करतात तोच खरा धर्म व ज्या आचरणाची निंदा करतात तो अधर्म जाणावा.
म्हणुनच परमेश्वराच्या अवतारास आपल्या अल्पबुध्दिच्या जोरावर तोलु नये .
भगवान श्री परशुरामांनी शास्त्रवचन पाऴले व त्याचा त्यांना लाभ कसा झाला हे सवचन पाहु.
विषादपि अमृतं ग्राह्यं बालदपि सुभाषितम् । हे मनुस्मृतितले फार सुंदर वचन आहे.विषापासुन अमृत काढुन घ्यावे व बालकांचे हितकर बोल देखील स्विकारावेत जेथुन जे जे चांगले घेता येईल ते ते स्विकारणे हे ब्रह्मचार्याचे परम कर्तव्य मानले आहे.
पिता हा गार्हपत्य माता हि दक्षिणाग्नि व गुरु हा आहवनीय आहे या तीन अग्निंच्या समुदायाची सेवा करणे हे अतिश्रेष्ठ आहे व जो ब्रह्मचारी प्रमाद न करता हे करेल तो त्रैलोक्यास तर जिंकलेच यात संशय नाहि हे शास्त्र वचन आहे.
भगवंतांनी या तीन गुरुंची सेवा अखंडित केली आहे त्यामुऴेच ते प्रचंड सामर्थ्यवान बनले.
भगवंत परशुरामांनी काश्यप, शंकर दत्तमहाराज अशा विविध गुरुंकडुन विविध विद्या ज्यात वेद शास्त्र, शस्त्रास्त्र व श्रीविद्या त्रिपुरा रहस्य वगैरे मोक्षविद्या अनुग्रहित केल्या व या सर्व गुरुंची निष्ठेने सेवा केली व त्याच सोबत माता पित्याची देखील सेवा त्यांनी केली या सर्वांच्या कृपेने ते प्रचंड सामर्थ्यवान बनले
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com