DevDharm —


*चौदा रत्नें*देव आणि दानव यानीं समुद्र्मंथन करून चौदा रत्नें अथवा मूल्यवान् ‌‍ वस्तु काढल्या त्या -
१ लक्ष्मी , २ कौस्तुभ , ३ पारिजातक , ४ सुरा , ५ धन्वंतरी , ६ चंद्र , ७ कामधेनु , ८ ऐरावत , ९ रंभा ( आदि अप्सरा ), १० उच्चैःश्रव नामक सप्तमुखी अश्व ( हा श्चेतवर्ण व उन्नतकर्ण असा होता ), ११ कालकूट विष , १२ शाङ्र्ग धनुष्य , १३ पांचजन्य शंख व १४ अमृत होय .
पंधरावें रत्न - दाता .*लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वतरिश्चंद्रमाः*
*गावः कामदुघाः सुरेश्वरगजो रम्मादिर्देवाङ्गनाः ।*
*अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चांबुधेः*
*रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्र्लम् ‌ ॥*
( मंगलाष्टक )
-------------------------


प्रत्येक जातींतील श्रेष्ठं वस्तूला रत्न अशी संज्ञा आहे .
अशी चौदा प्रकारचीं रत्ने पुराणांत वर्णिलीं आहेत तीं :-
१ हत्ती , २ घोडा , ३ रथ , ४ स्त्री , ५ पुरुष , ६ कोश ( धन ), ७ पुषमाला , ८ वस्त्र , ९ वृक्षराजि , १० शक्ति , ११ पाश , १२ मणि , १३ छत्र व १४ विमान .

*गजवाजिरथस्त्रीषु निधिमाल्यांवरद्रुमाः ।*
*शक्तिः पाशं मणिं छत्रं विमानानि चतुर्दश ॥* ( सु . )
*जातौ यदुत्कृष्टं तद्रत्नमभिधीयते ।*
( मल्लिनाथ )*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*