फाल्गुन कृ.१०
दि.३० मार्च २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांच्या चरीत्रातला एक महत्वाचा प्रसंग पाहु.
काल आपण भगवंतांनी शास्त्रसंमत आचरण करुन त्रैलोक्य विजय प्राप्तीकरता कसे सामर्थ्य मिऴवले या बद्दल पाहिले आज पुढे पाहु.

जमदग्नी हे एक श्रेष्ठ तपस्वी होते ते अंतर्ज्ञानी होते.रेणुका माता एकदा प्रात:समयी नदीवर पाणी आणण्याकरता गेल्या होत्या त्याच वेऴी चित्ररथ गंधर्व अापल्या स्त्रियांसह त्या ठिकाणी जलक्रिडा करत होता.त्याचे रुप व वैभव पाहुन निमिषमात्र रेणुकामातेचे मन विचलीत झाले काहि वेऴ तो जलविहार मातेने पाहिला व ती पाणी घेवुन लगबगीने माता आश्रमात पोहचली. (या ठिकाणी मानसीक व्याभिचार पातक मातेच्या हातुन घडले मैथुनाचे आठ प्रकार शास्त्रात वर्णलेले आहेत त्यामध्ये मनात अन्य व्यक्तिबद्दल इच्छा जागृत होणे याला मानस मैथुन अशी संज्ञा आहे.रेणुका माता या श्रेष्ठ पतिव्रता आहेत.वृ या धातु पासुन व्रत हा शब्द बनतो पातिव्रत्य हे कठोर व्रत आहे व या एका निमिषाच्या चुकीने मातेची तप:श्चर्या व्यर्थ जात होती) ह जमदग्नींना हे अंतर्ज्ञानाने सर्व कऴले हे पाप आहे व याला दंड दिलाच पाहिजे या विचाराने ते प्रचंड संतापले व त्यांनी आपल्या पुत्रांना मातेच्या वधाची आज्ञा दिली.भगवान श्री परशुरामांच्या अन्य चार जेष्ठ बधुंनी यास नकार दिला त्यामुऴे ते अधीक क्रोधायमान झाले त्यांनी भगवान श्री परशुरामांना हाक मारली व मातेचा व पितृआज्ञा उल्लंघन करणार्या चार बंधुंचा वध कर अशी आज्ञा भगवान श्री परशुरामांना केली.
भगवान श्री परशुरामांनी जमदग्नींचा क्रोध पाहिला व क्षणाचा विलंब न लावता मातेसह चार भावंडांचा वध केला.
क्षणार्धात जमदग्नींचा क्रोध शमला ते प्रसन्न झाले व भगवान परशुरामांना म्हणाले
" मी प्रसन्न झालो वर माग "
भगवान परशुरामांनी दोन वर मागीतले ते फार महत्वाचे आहेत
१ माते सह चारहि बंधु पुन:जिवंत करावे
२ त्यांना घडलेल्या घटनेची व पापाची स्मृति देखील त्यांचा मनात राहुदे नको
जमदग्नी सुप्रसन्न झाले त्यांनी त्या सर्वांना सजीव केले व रेणुका मातेच्या मनातली व भावंडांच्या मनातुन हि घटना पुसुन टाकली त्यांना या घटनेचे विस्मरण झाले .
भगवान परशुरामांच्या या बुध्दिचातुर्यावर प्रसन्न होवुन जमदग्नींनी भगवंताना चिरंजीव हो असे वरदान दिले. भगवान परशुरामांना आपल्या पित्याचे मंत्र व तप:सामर्थ्य माहित होते जमदग्नींच्या पूर्ण चरीत्रात ते केवऴ याच एकमेव प्रसंगात क्रोधायमान झालेत अगदि सहस्त्रार्जुनाने हल्ला करुन कामधेनु चोरली तेव्हा त्यांनी भगवान श्री परशुरामांना युध्द करण्यापासुन परावृत्त केले होते एवढे ते शांत होते. त्यांनी शाप देखील दिल्याचे एक देखील उदारण नाहि त्यामुऴे एकाच घटनेमुऴे त्यांना क्रोधी म्हणणे हे संयुक्त नाहि.
भगवान श्री परशुरामांनी नेमके तेच ओऴखले व पितृ आज्ञा पालन केली व क्षणार्धात पित्याचा क्रोध शांत झाल्यावर जमदग्नींच्या च तप:सामर्थ्याने या सर्वांना सजीव केले.
भगवान परशुरामांनी पितृ आज्ञा पाऴणे हे शास्त्रवचन सांभाऴले व मातेसह बंधुंना पुनरुज्जीवन प्राप्त करुन देवुन वात्सल्य हि सांभाऴले.
भगवंतांनी जर हे कार्य केले नसते तर जमदग्नींचा तो क्रोध रेणुका माता व चार बंधु व परशुरामांना भोगावा लागला असता. जमदग्नींनी सर्वांना शाप देवुन भस्म केले असते मग तर कोणीच वाचण्याची शक्यता नव्हती. भगवंतांनी या ठिकाणी युक्ति चातुर्य वापरले मातेसह चारहि भावंडांना सजीव केले.
या कथेवरुन अनेक बिग्रेडि, फेक्युलर भगवंतांवर टिका करतात भगवंतांनी मारले हि अर्धीच कथा वापरुन त्यांना वाईट ठरवतात मग भगवान परशुरामांनी या सर्वांना सजीव केले हा कथा उत्तरार्ध मात्र ते लपवतात.
एरवी पुराणे हि भाकडकथा असतात असे मानणारे हे लबाड भगवान श्री परशुरामांनी मातृवध केला हे मात्र कंठशोष करुन पुराणांच्या आधारेच मांडतात.
नक्कि गांजा कसला ओढतात तेच कऴत नाहि पुराणे जर भाकडकथा असतील तर मग परशुराम कथा असत्य का मानत नाहित.
या बिग्रेडि, भामसेफी लाल पावटे या सगऴ्यांचा हाच मोठा प्रॉब्लेम असतो .त्यामुऴे या मंडऴींकडे किंवा कादंबरी लेखकांनी रंगवलेल्या भगवान परशुरामांचे चरीत्र वाचुन ते वाईट होते असा ग्रह करु नका.ज्यांनी पृथ्वी जिंकल्यावर कोणीहि तुल्यबऴ विरोधक समोर नसताना ती पालन करण्याचे अंगी सामर्थ्य ज्ञान व पराक्रम असुन देखील परशुराम भगवंतांनी पृथ्वी दान दिली व स्वत:तपस्येला निघुन गेले त्या भगवंतांवर टिका करणे अनुचीत ठरेल. भगवंतांचा अवतार हा सज्जनांच्या रक्षणाकरता आहे ते लीला रचतील पण सज्जनांचा नाश मात्र कधीच करणार नाहित.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले.
Vengurlabhushsn@गमाची.com