फाल्गुन कृ.१३ बुधवार
३एप्रील २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.परवा आपण पापबुध्दिचे कारण व संक्रमण विचार या अंगाने चरीत्र भाग पाहिला आज पुढे.
भारतवर्षात अनेक तपस्वी व महापराक्रमी राजे होवुन गेले. नर्मदेच्या उत्तर तीरावर हैहय कुऴात असाच एक महातपस्वी परम दत्तभक्त व महापराक्रमी राजा जन्मला होता.कार्तवीर्य हे त्याचे नाव होते.याच्या पित्याचे नाव कृतवीर्य असे होते त्याचा पुत्र म्हणुन तो कार्तवीर्य. माहिष्मती नावाच्या नगरीचा तो चक्रवर्ती सम्राट होता.आजच्या मध्यप्रदेशात महेश्वर नगर या नावाने हा भाग ओळखला जातो.सप्तद्वीपांचे राज्य त्याचे होते..हैहय वंशात जन्मल्या मुऴे त्याला हैहय किंवा सहस्त्रबाहुंचे बळ अंगी असल्याने तो सहस्त्रार्जुन या नावांनी तो प्रसिध्द होता.
रावणाचा देखील याने पराभव केला होता एवढा हा सामर्थ्यवान होता.प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी त्याला अनुग्रह दिला होता. या कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाची अनेक मंत्रविधाने आज उपलब्ध आहेत शीघ्र फलदायी आहेत.
(॥ कार्तवीर्य द्वादशनामस्तोत्रम् ॥
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान् ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ १॥
कार्तवीर्यः खलद्वेषी कृतवीर्यसुतो बली ।
सहस्रबाहुः शत्रुघ्नो रक्तवासा धनुर्धरः ॥ २॥
रक्तगन्धो रक्तमाल्यो राजा स्मर्तुरभीष्टदः ।
द्वादशैतानि नामानि कार्तवीर्यस्य यः पठेत् ॥ ३॥
सम्पदस्तत्र जायन्ते जनस्तत्र वशं गतः ।
आनयत्याशु दूरस्थं क्षेमलाभयुतं प्रियम् ॥ ४॥
सहस्रबाहुसशरं महितं सचापं रक्ताम्बरं रक्तकिरीटकुण्डलम् ।
चोरादि-दुष्टभय-नाशं इष्टदं तं ध्यायेत् महाबल-विजृम्भित-कार्तवीर्यम् ॥ ५॥
यस्य स्मरणमात्रेण सर्वदुःखक्षयो भवेत् ।
यन्नामानि᳚महावीर्यश्चार्जुनः कृतवीर्यवान्᳚ ॥ ६॥
हैहयाधिपतेः स्तोत्रं सहस्रावृत्तिकारितम् ।
वाञ्चितार्थप्रदं नृणां स्वराज्यं सुकृतं यदि ॥ ७॥ ॥
इति कार्तवीर्य द्वादशनाम स्तोत्रम् ॥
हे त्याचे एक स्तोत्र देखील आहे.
अेखादि वस्तु हरवली किंवा सापडत नसेल, व्यक्ती परागंदा झाली असेल तर या स्तोत्राचा जप किंवा यातल्या प्रथम मंत्राचा जप केला असता वस्तु किंवा व्यक्ती संदर्भात तात्काऴ बातमी समजते, वस्तु सापडते असा अनुभव आहे) हजारो वर्षांचे तपस्वी आयुष्य याचे होते
पाश्चात्य विद्वान किंवा त्यांचीच "री "ओढणारे भारतीय यांच्या मते हा मदोन्मत्त राजा होता परंतु तसे नव्हते . भागवत महापुराणात नवम स्कंध १५ व्या अध्यायात या विषयी सुंदर वर्णन आहे .दत्तप्रभुंची सेवा करुन त्याला काय प्राप्त झाले या विषयी शुक मुनी म्हणतात

बाहुन् दशशतं लेभे दुर्धर्ष त्वमरातिषु।
अव्याहतेन्द्रियौज: श्री तेजोवीर्ययशोबलम् ।। (१८)
योगेश्वरत्वमैश्वर्यं गुणा यत्राणिमादय:।
चचाराव्याहतगतिर्लोकेषु पवनो यथा ।। १९

एकहजार बाहु व बऴ व शत्रुकडुन कधीच पराजीत न होण्याचा वर मागुन घेतला.त्याच सोबत इंद्रियांचे अबाधित बऴ, अतुल संपत्ती, तेजस्वीता, वीरता, कीर्ती व शारीरबळ त्याने प्राप्त केले.
तो योगेश्वर झाला .अणिमादी सर्व अष्टसिध्दि त्यास प्राप्त झाल्या तो पृथ्वीवर वायुप्रमाणे संचार करत असे. असा हा महापराक्रमी व तेजस्वी राजा हजारो वर्षे राज्य करत होता.
रावणाचे व याचे युध्द का झाले? रावण कसा सुटला हा भाग उद्या पाहु
तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले