२ मे २०१९
चैत्र कृ.१३ गुरुवार
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
भगवान श्री परशुरामांनी शास्त्रपालन करण्याकरताच २१ वेऴा पृथ्वीवरील दुष्ट राजांचा संहार केला
#अत्रिस्मृति
दुष्टस्य दण्ड: सुजनस्य पूजा न्यायेन कोशस्य संप्रवृध्दि:।
अपक्षपातोर्थिषु राष्ट्ररक्षा पञ्चैव यज्ञा:कथिता नृपाणाम् ।।
दुष्टांना दंड, सुजनांचा आदर सत्कार, न्यायमार्गाने धन वाढवणे, पक्षपात राहित न्यायदान व राज्य व प्रजेचे रक्षण हे राजाचे पंचमहायज्ञ आहेत हे राजाचे परमकर्तव्य आहे.
#शंखलिखितसमृति
गावो भूमि: कलत्रंच ब्रह्मस्वहरणं तथा।
यस्तु न त्रायते राजा तमाहुर्ब्रह्मघातकम्।। २४
जो राजा गाय, भूमी, कलत्र (पत्नी, पुत्र, प्रजा नातेवाईक) व ब्रह्मस्व यांचे रक्षण करत नाहि तो ब्रह्मघातकी असतो.
दुर्बलानामनाथानां बाल वृध्द तपस्विनाम् । अन्यायै:परिभूतानाम् सर्वेषां पार्थिवौ गति:।।
दुर्बऴ, अनाथ, बालक, वृध्द, तपस्वी वगैरे मनुष्यांची राजा हिच गती आहे
विविध स्मृतिग्रंथांमध्ये राज्यप्रबंध प्रकरणे आली आहेत त्यात राजाचे वर्तन, नियम, प्रजापालन, न्यायदान, करव्यवस्था , गुरुकुल व्यवस्था, वाणिज्य, सेवाक्षेत्रे याविषयी राजाचे कर्तव्य कसे असावे यावर विपुल लेखन ऋषिंनी केले आहे.या सर्वांचा त्याग करुन अयोग्य पध्दतीने, धर्मभ्रष्ट होवुन जो राजा प्रजेला त्रास देत असेल त्याची कानउघडणी करणे अथवा दंडदेणे हे आचरणसंपन्न ब्राह्मणाचे अथवा धर्मसभेचे कर्तव्य आहे भगवान श्री परशुरामांनी वरील प्रकारचे आचरण न करणार्या अन्यायी व कर्तव्यपराङ् मुख राजांचाच वध केला होता
राजा हा आचरण संपन्न न्यायी,विद्वान, कलासक्त, पराक्रमी, विनयशील, बुध्दिमान, दाता व सदाचरण तत्पर हवा .
जनक दशरथ यांच्याप्रमाणेच
विश्वामित्र हे देखील भगवान परशुरामांच्या समकालीनच होते ते त्यावेऴी ब्रह्मर्षी पदाला पोहचले नव्हते परंतु ते राजर्षी मात्र अवश्य होते (जमदग्नींचे ते नात्याने मामा लागत होते) भगवान परशुरामांनी त्यांच्यावर कधीच आक्रमण केले नव्हते
विश्वामित्रांचा वंशविस्तार व गोत्र नामावऴी भागवत महापुराणात विस्ताराने आलाय तो मुऴातुनच पाहावा.
सरसकट सगऴेच क्षत्रिय मारले असते तर विश्वामित्रांचे वारसदार देखील शिल्लक राहिले नसते पण भागवत महापुराणात तर विश्वामित्रांच्या कौशिक गोत्राचे (कुशिकाचे वंशज म्हणुन) वंशविस्तारामुऴे झालेले प्रवर भेद व गोत्रभेद देखील विस्ताराने दिलेत याचाच अर्थ भगवंतांनी पृथ्वी पूर्णपणे नि:क्षत्रीय केली नाहि हाच होतो व हेच सत्य आहे.
भगवंतांनी दुष्टांचे विवेकाने केलेले निर्दालन हेच या लढ्याला योग्य विशेषण ठरेल
तेव्हा अपप्रचारास बऴी पडु नका हिच विनंती.
२१ वेऴा दुष्ट निर्दालन केल्यानंतर भगवान श्री परशुरामांनी एक मोठा यज्ञ केला व या सर्व राज्यांची व्यवस्था लावण्याकरता त्यांनी काय केले? हे आपण पुढिल भागात पाहु.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
VengurlabhushanGmail.com