सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे दिव्य चरीत्र पुढे पाहु.
मागील भागात श्री परशुराम व जमदग्नींना यज्ञाचे फल म्हणुन काय प्राप्त झाले हे पाहिले व त्याच सोबत श्रीराम व सीता विवाह व शिवधनुष्य कथा पाहिली आज पुढे.
श्रीरामांच्या विवाहा सोबत त्यांच्या अन्य बंधुंचे विवाह देखील संपन्न झाले व दशरथ राजा आपल्या पुत्र व स्नुषांसह वरात घेवुन निघाले वाटेत काहि ठिकाणी त्यांना शुभ व अशुभ संकेत मिऴु लागले आणी तेवढ्यात मोठे वादऴ आले.अनेक वृक्ष कोसऴु लागले सूर्य धुऴीच्या अंध:काराने आच्छादला गेला, दिशांचे ज्ञान होईन. या महा प्रचंड आवेश युक्त वादऴात दशरथ राजा, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न व वसिष्ठ मुनी हेच सचेत राहिले बाकी सर्व जण अचेतन झाले.
दशरथ राजांनी पाहिले समोर भृगुकुल नंदन श्री परशुराम उभे ठाकले होते
वाल्मिकी ऋषिंनी त्यांचे वर्णन फार सुंदर केलय
ददर्श भीम संकांशं जटामण्डलधारिणम् ।
भार्गवं जामदग्नेयं राजा राज विमर्दनम् ।।
कैलासमिव दुर्धषं कालाग्निमिव दु:सहम् ।
ज्वलन्तमिव तेदोभिर्निरीक्ष्यं पृथग्जनै:।।
स्कन्धे चासज्ज्य परशुं धनुर्विद्युद्गोपमम् ।
प्रगृह्य शरमुग्रंच त्रिपुरघ्नं यथा शिवम् ।।
(वा.रामा.बालकांड ४७- १७ ते १९)
दुष्ट क्षत्रिय राजांचे विमर्दन करणारे भगवान परशुराम समोर आहेत ज्यांच्या मस्तकावर मोठमोठ्या जटा आहेत, जे कैलासा प्रमाणे दुर्जय व कालाग्नि प्रमाणे त्यांचे तेज सहन न होणारे आहे जे दु:सह आहेत. ज्यांचे तेजोमंडल जाज्वल्यमान भासत आहे.सर्वसामान्य माणुस त्यांच्याकडे पाहु शकत नाही ज्यांनी आपल्या खांद्यावर परशु व विद्युत तेज समान धनुष्य व भयंकर बाण धारण केलेले आहेत जे प्रत्यक्ष त्रिपुरांतक शिव शंकरांसारखे भासत आहेत.
त्या नंतर दशरथ राजांनी भगवान परशुरामांची प्रार्थना केली परंतु भगवान परशुराम अत्यंत क्रुध्द झालेले होते. त्यांनी दशरथ राजाकडे दुर्लक्ष केले व श्री रामांना म्हणाले मला तुमचा पराक्रम पाहयचा आहे.#वैष्णव_व_शिव_धनुष्य ही दोन्हि विश्वकर्मांनी बनवली होती.#त्रिपुरासुराचा_वध करण्याकरता शिवधनुष्य वापरले गेले होते ते तुम्हि मोडले आहे त्यामुऴे हे #वैष्णव_धनुष्य हाती घे व यावर बाण चढवुन शत्रुनगरीवर सोडुन दाखव.
{ #शिव_वैष्णव_धनुष्याची कथा अशी जेव्हा विश्वकर्मांनी हि दोन धनुष्य बनवली व देवतांकडे सुपूर्द केली तेव्हा ब्रह्मदेवांनी यातले एक धनुष्य भगवान शंकरांना व एक महाविष्णुंना दिले .मग देवतांनी प्रश्न केला या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तेव्हा ब्रह्माजींनी या दोघांमधे वाद सुरु केला व तो युध्दापर्यंत पोचला .या दोघांमधे बाणांचे घनघोर युध्द सुरु झाले त्याच समयी महाविष्णुंनी एक मोठा हुंकार दिला व त्यामुऴे शिवधनुष्य थोडे कमजोर पडले. मग दोन्हि देवता शांत झाल्यावर त्यांनी आपआपली धनुष्ये म्हणजे शिवधनुष्य देवरात राजाकडे (जनकाचा पूर्वज) व वैष्णव धनुष्य भृगुवंशी ऋचीक ऋषिंकडे सांभाऴण्याकरता दिले }
तेच महापराक्रमी वैष्णव धनुष्य हाती घेवुन परशुराम श्रीरामांची परीक्षा पहावी व त्यांना द्वंद्व युध्दाकरता बोलवावे या साठीच आवेशासह आले होते.या सर्व प्रकारामुऴे वसिष्ठ वगैरे ऋषिगण, दशरथ राजा सर्व मंडऴी चिंतेत पडली. भगवान परशुरामांचा पराक्रम व क्रोध सर्वांना ज्ञात होता.आता पुढे काय घडेल हि सर्वांना काऴजी वाटु लागली
केवऴ श्री परशुरामांच्या येण्या मुऴे त्यांचा या आवेशामुऴे जर एवढे भयंकर वादऴ झाले.मोठमोठी झाडे कोसऴली, धूळीमूऴे अंध:कार पसरला, सैन्य अचेतन झाले तर यांच्याशी युध्द झाले तर काय आपत्ती ओढावेल हा घोर दशरथांसह सर्वांना लागुन राहिला.
श्री राम मात्र शांत व गंभीर होते त्यांनी न घाबरता श्री परशुरामांशी संवाद सुरु केला
पुढे काय घडले वैष्णव धनुष्यावर बाण चढवला का? त्याचे परीणाम काय झाले? हे पुढिल भागात पाहु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com