सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज मोक्षदा एकादशी निमित्त भगवद्गीतेचे माहात्म्य मांडण्याचा प्रयत्न करतोय सनातन वैदिक हिंदु धर्मातल्या उपनिषद प्रतिपाद्य श्रेष्ठ तत्वज्ञानाचे सार योगेश्वर कृष्णांनी अर्जुनास कुरुक्षेत्रावर अवघ्या ७०० श्लोकांमधे सांगीतले तो दिवस म्हणजे #मोक्षदा_एकादशी. गीता जयंती चा हा दिवस.
आम्हा कपाऴ करट्यांचे दुर्दैव असे कि आम्हि हिंदु बांधव ज्या आनंदाने #वेलेंटाईन_डे सारखे अनेक भुक्कड दिवस मोठ्या आनंदाने साजरे करतो. त्यातल्या एक सहस्त्रांशाने देखील #गीता_जयंती साजरी करत नाही.#हिंदुत्ववादी म्हणवणार्या अनेक पक्षांना किंवा संघटनांना हिंदुंच्या या परमश्रेष्ठ एकमेव अद्वितीय तत्वज्ञान प्रकट दिनाचे औत्सुक्य असत नाही नव्हे नव्हे तर गीता जयंती बद्दल यांना आस्था देखील नसते.
जगभरातल्या अनेक तत्ववेत्यांन्या ज्या तत्वज्ञानाची भुरऴ प़डली ते तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीता.जगातल्या सर्व प्रमूख भाषांमधे भाषांतरीत झालेला एकमेव ग्रंथ म्हणजे भगवद्गीता.
कुराण (इस्लाम) बायबल यांच्या प्रचार व प्रसाराकरता करोडोंचा निधी उपलब्ध होतो.दुर्दैवाने अाम्हि हिंदु मंडऴी श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रसाराकरता आर्थिक योगदान देत नाही.किंवा त्याची अत्यल्प दरात उपलब्ध असलेली एखादि प्रत देखील भेट म्हणुन देत नाही.
गीता प्रेस, इस्कॉन सारख्या संस्था अत्यल्प दरात उत्तम पैकी गीता मुद्रण करतात ग्रंथ उपलब्ध करतात . आद्य शंकराचार्यांनी संस्कृत मधे गीताभाष्य लिहिले.ज्ञानोबा माऊलींनी ९००० ओव्यांमध्ये भगवद्गीतेचे प्रासादिक रसाऴ सुमधुर भाष्य म्हणजे भावार्थदिपीका (ज्ञानेश्वरी) लिहिली, अंबेजोगाई येथील संत सर्वज्ञ दासोपंतांनी सव्वा लाख ओव्यांचे त्यावर भाष्य लिहिले. भारतातल्या अनेक श्रेष्ठ ज्ञानी मंडऴींनी गीतेवर विविध टिका व भाष्य लिहिली आहेत. लोकमान्य टिऴकांनी गीतेतला कर्मयोग प्रधान मानुन गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.आचार्य विनोबा भावेंनी गीताई लिहिली..१८ अध्याय व ७०० श्लोकांवर किती विपूल लेखन झालय ते पाहावे.
#श्रीभगवद्गीता_पठणाचे_फल

गीताशास्त्र मिदं पुण्यं य:पठेत् प्रयत:पुमान् ।
विष्णो:पदमवाप्नोति भयशोकादिवर्जित:।।
(जो मनुष्य गीता शास्त्र नित्य पठण करेल तो भयशोकातुन मुक्त होवुन विष्णु पद प्राप्त करेल

गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्यच ।
नैव संति हि पापानि पूर्वजन्मकृतानिच ।।
मलनिर्नोचनं पुंसां जलस्नानं दिनेदिने ।
सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनम् ।।
गीता सुगीता कर्तव्या किमन्यै:शास्त्र विस्तरै:।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनि:सृत:।।
भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राग्विनि:सृतम् ।
गीता गंङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्मो न विद्यते।।
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:।
पार्थो वत्स:सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।

वरील श्लोकांमधे भगवद्गीतेचे माहात्म्य विस्ताराने आलेय गीता हि मोक्षदायिनी, पापनाशिनी आहे.प्रत्यक्ष भगवंतांनी आपल्या मुखकमलातुन अर्जुनाला केलेला हा शास्त्रउपदेश आहे.गीता व गंगोदक जो प्राशन करेल त्याला पुनर्जन्म मिऴणार नाही तो निश्चित मोक्षालाच जाईल.
सर्व उपनिषदे या गोमाता आहेत व त्यांचे दोहन करुन तत्वज्ञानाचे अमृत सार गोपालकृष्णांनी अर्जुनास दिले आहे. ते अमृत सार आपण सर्वांनी प्राशन केले तर या मनुष्यदेहाचे सार्थक होईल यात शंका नाही.संस्कृत हि कठीण भाषा नाही.अनेक ठिकाणी गीतेचे वर्ग विनामुल्य चालतात तिथे जावे गीतेचे अध्ययन पठण करावे नित्य एक अध्याय म्हणावा हा मनुष्य देह सार्थकी लावावा.
यंदा पासुन एक संकल्प करुया एक गीतेची प्रत आपण आपल्या घरी आणुया व मंगलकार्यात (लग्न मुंज वास्तुशांत वगैरे)आपण मित्रमंडळींना नातेवाईकांना अहेर करतो तेव्हा या अहेरा सोबत एक भगवद्गीता भेट देवुया.ज्यामुऴे आपल्या धर्माचे श्रेष्ठ तत्वज्ञान घरोघरी पोचेल.
तुर्त लेखन मर्यादा
©वे.भूषण दिगंबर जोशी वेॆगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com