भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच आपली श्रद्धास्थाने, त्यांच्याशी संबंधित सर्वच गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आपल्यावर दैवी कृपा नित्य असावी, येणारी संकटे आपदा या नष्ट व्हाव्या किंवा किमान त्यांची तीव्रता कमी व्हावी म्हणून आपण आपल्या दैवतांची विवध प्रकारे उपासना आराधना करत असतो.
अशा वेळी आपण वेगवेगळी स्तोत्र मंत्र स्तुती स्तवन अशा वाङ्मयाचा आपण उपयोग करतो. परंतु हे सारे एकाच ठिकाणी उपलब्ध नसते.
.......म्हणूनच हा लहानसा प्रयत्न.
आपल्याला या संकेतस्थळावर विविध स्तोत्र, मंत्र, देवस्तुती, आरत्या, हे सारं तर एका ठिकाणी मिळेलच परंतु अनेकविध अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक विषयांवरील लिखाण, अनेक जाणकार व अभ्यासू व्यक्तींचे लेख, मार्गदर्शन देखील उपलब्ध असेल......
सर्वांच्या सहकार्याने व जाणकारांच्या मार्गदर्शनाने यात अधिक प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न नित्य होत राहील....