परंपरा, अध्यात्म आणि संस्कृती — डिजिटल विश्वात विप्र शोध info@devdharm.com
देवधर्म DevDharm.com
देवधर्मDevDharm.com
मुख्य विभाग
अधिक
मुख्यपृष्ठ / आरती / जय जय जगदंबे
आरती रेणुका माता

जय जय जगदंबे

जय जय जगदंबे श्री अंबे। रेणुके कल्पकदंबे ।। धृ । अनुपम स्वरुपाची । तुझी धाटी । अन्य नसे या सृष्टी । तुझ सम रूप दुसरे । परमेष्टी ॥ करिती झाला कष्टी । शशी रसरसला । वदनपुटी । दिव्य सुलोचन दृष्टी । सुवर्ण रत्नांच्या ॥ शिरी मुकुटी । लोपती रविशशी कोटी । गजमुखी तुज स्तविले । हे रंभे मंगल सकलारंभे ॥ जय जय ॥ १ ॥ कुमकुम शिरी शोभे । मळवटी । कस्तुरी तिलक ललाटी । नासिक अति सरळ । हनुवटी ।। रुचीरामृत रस ओठी । समान जणू लवल्या । धनकोटी । आकर्ण लोचन भ्रुकुटी । शिरी नीट भांगवळी । उफराटी॥ कर्नाटकाची घाटी । भुजंग निळरंगा । परी शोभे । वेणी पाठी वरी शोभे ॥ जय जय ॥ २ ॥ कंकणं कनकाची । मनगटी । दिव्य मुद्रा दश बोटी बाजूबंद नगे । बाहुबटी ॥ चर्चुनी केशर उटी । सुगंधी पुष्पांचे हार कंठी । बहु मोत्यांची दाटी । अंगी नवीचोळी । जरीकाठी ॥ पीत पितांबर तगटी । पैंजणं पदकमली । अति शोभे । भ्रमर धावती लोभे ।। जय जय ॥३ ॥ साक्षेप तू क्षितिजा । तळवटी । तूच स्वये जगजेठी । ओवाळीन आरती दीपताटी॥ घेउनी कर संपुष्टी । करुणामृतहृदये । संकटी । धाविसी भक्तांसाठी विष्णू सदा । बहु कष्टी ॥ देशील जरी निजभेटी । तरी मग काय उणे । या लाभे । धाव पाव अविलंबे ॥जय जय ॥ ४ ॥