परंपरा, अध्यात्म आणि संस्कृती — डिजिटल विश्वात विप्र शोध info@devdharm.com
देवधर्म DevDharm.com
देवधर्मDevDharm.com
मुख्य विभाग
अधिक
मुख्यपृष्ठ / आरती / सुखकर्ता ...
आरती गणपती

सुखकर्ता ...

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||१|| जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रें मनकामना पूर्ती ||धृ|| रत्नखचित फरा तुज गौरीकुमारा चंदनाची उटी कुंकुमकेशरा हिरेजडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नुपुरें चरणी घागरीया ||२|| लंबोदर पितांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ||३||